90 टक्क्यांत मुंबई भारी!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

मुंबई - मुंबई विभागाचा बारावीचा निकाल ८७.४४ टक्के लागला. मुंबईतून ३,११,६५९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २,७२,५१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यातील ३८,२१४ विद्यार्थ्यांनी प्रावीण्य आणि ७५ टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळवले. २,२८८ विद्यार्थ्यांचे गुण ९० टक्‍क्‍यांहून अधिक आहेत. 

विज्ञान शाखेतून ९०,६१२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ८४,३६३ विद्यार्थी (९५.८५ टक्के) उत्तीर्ण झाले. कला शाखेतून ४६,४८८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३५,९३७ विद्यार्थी (७७.३० टक्के) उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेतून १,६९,०९१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १,४७,७८९ विद्यार्थी (८७.१४ टक्के) आणि व्यावसायिक अभ्यासक्रमातून ४,९६८ विद्यार्थ्यांपैकी ४,४२९ विद्यार्थी (८९.१५ टक्के) उत्तीर्ण झाले. 

उपनगर-२ ची आघाडी
मुंबई मंडळातील उपनगर-२ चा निकाल सर्वाधिक (९९.४६ टक्के) लागला. दक्षिण मुंबईचा निकाल सर्वात कमी (८५.०६) लागला. त्यापाठोपाठ ठाणे (८८.४६), रायगड (८६.८७), पालघर (८६.७०) आणि मुंबई उपनगर-१ (८८.५९)चा क्रमांक आहे.

‘17 नंबर’मुळे अधोगती 
१७ नंबरचा अर्ज भरून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मुंबई मंडळात सर्वाधिक आहे. त्याचा परिणाम मुंबईच्या निकालावर होत आहे. अकरावीत अनुत्तीर्ण झालेले, बऱ्याच वर्षांनी परीक्षा देणारे आणि नोकरी करणारे विद्यार्थी १७ नंबरचा अर्ज करून बारावीची परीक्षा देतात. त्यांचे पास होण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने इतर मंडळांच्या तुलनेत मुंबईचा निकाल कमी लागला. मुंबईचा यंदाच्या वर्षीचा निकाल ८७.४४ लागला. गतवर्षीचा निकाल ८८.२१ टक्के होता.

Web Title: Mumbai division HSC results is 87.44 per cent