
मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने एप्रिल ते मे २०२५ या अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत मालवाहतुकीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ३.४३ दशलक्ष टन माल लोड करण्याची विक्रमी नोंद केली आहे. यापैकी मे महिन्यात एकट्या १.७७ दशलक्ष टन मालाची चढाई झाली असून, मागील वर्षीच्या तुलनेत ही लक्षणीय वाढ आहे.