esakal | मूत्राशयातून काढला नारळाच्या आकाराचा मूतखडा, मुंबईत झाली शस्त्रक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

मूत्राशयातून काढला नारळाच्या आकाराचा मूतखडा, मुंबईत झाली शस्त्रक्रिया

मूत्राशयातून काढला नारळाच्या आकाराचा मूतखडा, मुंबईत झाली शस्त्रक्रिया

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई: कोलकात्याच्या 17 वर्षीय मुलाच्या मूत्राशयातून नारळाच्या आकाराचा मूतखडा (coconut size stone) काढण्यात यश आले आहे. मुंबईत या मुलावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ईईसी या दुर्मिळ स्थितीचा सामना करणा-या 17 वर्षीय मुलाच्या आकाराने विस्तारलेल्या मूत्राशयातील नारळाच्या आकाराचा खडा माहिमच्या एल.एल. रहेजा रुग्णालयातील (raheja hospital) डॉक्टरांनी (doctor) यशस्वीरित्या काढून टाकला. ईईसी (EEC) ही एक दुर्मिळ स्थिती असून जन्माला आलेल्या दर 1,00,000 बालकांपैकी एका बालकात ती आढळून येते. (Mumbai doctor gives 17 year old kolkata boy new lease of life twice removed coconut size stone)

रुबेन शेखच्या मूत्राशयातून नारळाच्या आकाराचा 1 किलो ग्रॅम वजनाचा खडा यशस्वीरित्या बाहेर काढला. या अनाथ मुलाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली. तसेच आकाराने वाढलेल्या मूत्राशयाची पुनर्रचनाही केली.

हेही वाचा: उद्धवजी मुख्यमंत्री झाल्यावर राणे तुम्ही काय प्रतिक्रिया दिली ते जरा आठवा - अरविंद सावंत

रुबेनचे मूत्राशय अनावृत्त होते व त्याच्या जननेंद्रियामध्ये व्यंग होते. एक्ट्रोफी-एपिस्पाडियास कॉम्प्लेक्स (ईईसी) नावाची ही दुर्मिळ स्थिती आहे. अशा रुग्णांच्या बाबतीतली सर्वात मोठी गुंतागुंत म्हणजे अशाप्रकारचे बाहेर आलेले मूत्राशय मूत्र साठवून ठेवू शकत नाही किंवा योग्यप्रकारे काम करू शकत नाही, याच्या परिणामी मूत्राची गळती होते.

हेही वाचा: अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांच्या लसीकरणासाठी BMC चा प्लान

कन्सल्टन्ट पीडिएट्रिक सर्जन डॉ. राजीव रेडकर यांनी सांगितले की, अनेक वर्षांपूर्वी रुबेनला झालेल्या एका अपघातानंतर त्याच्यावर मूत्राशय पुनर्रचनेच्या अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. त्याला कॅथेटरचा वापर करून लघवी करता यावी यासाठी काही काळापूर्वी त्याच्यावर ब्लॅडर ऑगमेंटेशन आणि मित्रोफॅनॉफ शस्त्रक्रिया करून त्याच्या पोटावर एक नवीन नलिका बसवली होती. ही नलिका अपेंडिक्सपासून बनवण्यात आली होती व नाभीमध्ये तयार करण्यात आलेल्या एका लहानशा छिद्रावाटे ती मूत्राशयाला जोडण्यात आली होती. मात्र, या शस्त्रक्रियेनंतर तो पुन्हा कोलकात्याला गेला आणि त्यानंतर या गोष्टीचा पाठपुरावा त्याच्याकडून झाला नाही. काही दिवसांपूर्वी मात्र प्रचंड अस्वस्थता, वेदना जाणवत असल्याने आणि लघवीवर नियंत्रण ठेवणे अशक्य झाल्याने त्याने मदतीसाठी त्याचा फोन आला. त्याची परिस्थिती हालाकीची असल्याकारणाने व्यवस्थापनाने ही शस्त्रक्रिया मोफत करण्याचा निर्णय घेतला.

ही शस्त्रक्रिया 30 जून रोजी झाली आणि मूत्राशयाची पुनर्रचना करणे हे एक प्रचंड कठीण काम असल्याने ही शस्त्रक्रियाही खूपच गुंतागुंतीची आणि दुर्मिळ असल्याचे त्यांनी ठळकपणे नमूद केले. रुबेन याने या शस्त्रक्रियेला उत्तम प्रतिसाद दिला आहे. त्याची मूत्रपिंडे चांगल्या प्रकारे सुरक्षित असून त्यांचे कार्य सुरळीतपणे सुरू आहे. अशा प्रकरणांमध्ये रुग्णाच्या स्थितीचे दीर्घकालीन व्यवस्थापन करणे आणि नियमितपणे पाठपुरावा व तपासण्या करत राहणे गरजेचे आहे.

loading image