Mumbai Dombivali hilly area owl  house Gopalnagar area
Mumbai Dombivali hilly area owl house Gopalnagar areasakal

Mumbai : पहाडी भागातील दिवाभीत घुबड आढळले डोंबिवलीत

डोंबिवली पूर्वेतील गोपाळनगर परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरात घुबड आले होते. परिसरातील कावळे त्याच्या मागे लागले असल्याने घाबरुन त्याने एका घराच्या बाल्कनीचा आसरा घेतला होता.
Published on

डोंबिवली- हिमालय पर्वतीय प्रदेशात, काश्मिर मध्ये आढळणारे दिवाभित घुबड हे डोंबिवलीत आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. डोंबिवलीतील गोपाळनगर येथील एका रहिवाशांच्या घरात हे घुबड आले होते.

प्राणीमित्र निलेश भणगे यांनी या घुबडाची सुटका केली आहे. गेल्या दहा वर्षात ठाणे, मुंबई परिसरात प्रथमच हे दिवाभीत घुबड दिसल्याचे त्यांनी सांगितले.

डोंबिवली पूर्वेतील गोपाळनगर परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरात घुबड आले होते. परिसरातील कावळे त्याच्या मागे लागले असल्याने घाबरुन त्याने एका घराच्या बाल्कनीचा आसरा घेतला होता. याची माहिती पॉज संस्थेचे संस्थापक निलेश भणगे यांना मिळाली.

त्यांनी तात्काळ प्राणी मित्र ओंकार साळुंखे याला रेस्क्यूला पाठविले. ओंकार याने घुबडची सुटका केली आहे. त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही. सायंकाळी त्याला सुखरुप निसर्गाच्या सान्निध्यात सोडले जाईल असे निलेश यांनी सांगितले.

दिवाभीत किंवा साज शिंगी या जातीतील हे घुबड आहे. ठाणे, मुंबई परिसरात गेल्या दहा वर्षात या जातीचा प्रथमच हा घुबड आढळून आल्याचे त्यांनी सांगितले.

आकाराने लहान कानांवर पिसे असलेले हे घुबड आहे. नर व मादि दिसायला सारखेच व साधारण राखाडी रंगाचे असतात. पिवळी झाक असलेला राखट पिंकट, त्यावर बारीक काळ्या रेखीव रेषा असतात.

हे लहान घुबड असून कानांवर पिसे आहेत, राखट रंगाचे घुबड असून त्याच्या अंगावरचा रंग पिवळी झाक असलेला राखट- पिंकट, त्यावर बारीक रेखीव काळ्या रेषा. खालील अंगाचा रंग पिवळट आणि त्यावर दाट काळ्या रेषा असतात.

नर व मादी दिसायला सारखे असतात. डोंगराळ भागात हे आढळून येतात या घुबडांचे खाद्य हे छोटे पक्षी, कीटक, उंदीर आणि सस्तन प्राणी आहे असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com