esakal | Mumbai Drug Case: कॉर्डेलिया क्रूझचा आणि त्या घटनेचा संबंध नाही : जर्गेन बेलोम
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Drug Case

कॉर्डेलिया क्रूझचा आणि त्या घटनेचा संबंध नाही : जर्गेन बेलोम

sakal_logo
By
दत्ता लवांडे

Mumbai Drug Case : एनसीबीने ज्या कॉर्डेलिया क्रूझवर (Cordelia Cruises) कारवाई करत ड्रग्ज पार्टीसाठी ८ जणांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेशी कॉर्डेलिया क्रूझचा कोणताही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संबंध नाही. असे कॉर्डेलिया क्रूझ च्या अधिकृत निवेदनात श्री जर्गेन बेलोम यांनी म्हटले आहे.

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूझवरील रेव्ह पार्टीवर छापा टाकत एनसीबी ने बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान सह आठ जणांना अटक केली आहे. यामध्ये तीन मुलींचापण सामावेश आहे. या रेव्ह पार्टीचे बॉलिवूड कनेक्शन समोर आले आहे. आर्यन खानला ताब्यात घेण्यात आल्याचे कळताच बॉलीवूडमध्ये अस्वस्थता पसरल्याचे दिसून आले आहे. तसेच आपल्याला व्हीआयपी गेस्ट म्हणून बोलावण्यात आलं होतं असं शाहरूख खान चा मुलगा आर्यन खान याने चौकशीदरम्यान सांगितल्याचे एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी सांगितले.

हेही वाचा: Mumbai Drug Case: खरा रिपोर्ट समोर येऊ द्या! अभिनेता सुनील शेट्टीचं व्टिट

एनसीबीला क्रूजवर ड्रग्जबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर एनसीबीचे काही अधिकारी प्रवासी बनून तिथं गेले होते. त्यानंतर समुद्रात क्रूज गेल्यानंतर जेव्हा पार्टी सुरु झाली तेव्हा एनसीबीने कारवाई केली. तसेच क्रूझवर ड्रग्स सॅनिटरी नॅपकीन, कॉलर, पर्स याद्वारे आणण्यात आल्याचे सांगितले जात असताना कॉर्डेलिया क्रूझने आपले जहाज एका खासगी कार्यक्रमासाठी दिल्लीस्थित इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला भाड्याने दिले होते असे सांगितले. त्यामुळे या घटनेचा आणि कॉर्डेलिया क्रूझचा कसलाही संबंध नाही, सदर घटनेचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो असं जर्गेन बेलोम यांनी कॉर्डेलिया क्रूझच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

तसेच कॉर्डेलिया क्रूझ कडून या घटनेचा निषेध करत यानंतर अशा घटना घडणार नाहीत याची आम्ही काळजी घेऊ असे त्यांनी म्हटले आहे. एनसीबीला आणि तपासयंत्रणेला आम्ही पूर्णपणे सहकार्य करू असं स्पष्टीकरण कॉर्डेलिया क्रूझकडून देण्यात आलेलं आहे.

loading image
go to top