Mumbai Drug Case: खरा रिपोर्ट समोर येऊ द्या! अभिनेता सुनील शेट्टीचं व्टिट

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्टेलिया क्रुझ प्रकरणावरील ती रेव्ह पार्टी आता भलतीच चर्चेत आली आहे.
Mumbai Drug Case: खरा रिपोर्ट समोर येऊ द्या! अभिनेता सुनील शेट्टीचं व्टिट

मुंबई - मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्टेलिया क्रुझ प्रकरणावरील ती रेव्ह पार्टी आता भलतीच चर्चेत आली आहे. ही पार्टी हायलाईट होण्याचं कारण म्हणजे त्यात वेगवेगळ्या सेलिब्रेटींच्या मुलांचा सहभाग त्यात दिसून आला आहे. बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याचाही त्या पार्टीमध्ये सहभाग असल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले आहे. त्यानंतर त्याला एनसीबीनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. काही वेळातच सोशल मीडियावर आर्यन खानचं नाव व्हायरल झालं आहे. या प्रकरणावर पहिल्यांदा दुसऱ्या एका सेलिब्रेटीनं प्रतिक्रिया दिली आहे. त्या अभिनेत्याचं नाव सुनील शेट्टी आहे. त्यानं दिलेल्या प्रतिक्रियेमुळे आगामी काळात हे प्रकरण वेगळ्या प्रकारे चर्चेत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आर्यन खानला ताब्यात घेण्यात आल्याचे कळताच बॉलीवूडमध्ये अस्वस्थता पसरल्याचे दिसून आले आहे. त्याचे पहिले उदाहरण सुनील शेट्टीच्या प्रतिक्रियेनं समोर आले आहे. त्यानं आपल्या व्टिटमध्ये म्हटले आहे की, जेव्हा त्या क्रुझवर रेड टाकण्यात आली तेव्हा जे घडलं ते प्रामाणिक समोर येण्याची गरज आहे. कुणा एकाचे नाव घेऊन बाकीच्यांकडे दुर्लक्ष होता कामा नये. यामुळे सुनीलचा रोख मोठमोठ्या उद्योगपतींच्या मुलांकडे असल्याचे दिसून आले आहे. तो पुढे म्हणतो, अनेक लोकांना तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र नावं काहींचीच समोर आली आहे. अजून प्रक्रिया सुरु आहे.तेव्हा लोकांनी देखील थेट नित्कर्ष काढण्याच्या भानगडीत पडू नये. तसेच अधिकाऱ्यांनी देखील जे दोषी आहेत त्या सगळ्यांची नावं जाहीर करावीत. सुनीलनं अशाप्रकारे एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थिक केलं आहे.

सुनीलचं व्टिट व्हायरल होताच दुसरीकडे एएनआयनं एनसीबीच्या अधिकाऱ्यांचं व्टिट व्हायरल केलं आहे. त्यात त्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की, आम्ही मुंबईतील त्या पार्टीच्या कारवाईबाबत सातत्यानं माहिती घेतो आहोत. अजून ती कारवाई सुरु आहे. आपण जर मिळालेल्या माहितीकडे पाहिलं तर असे दिसून येईल की आतापर्यत तीनशेहून अधिक जणांना एनसीबीनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. यामध्ये काही परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. काही चित्रपटाशी संबंधित आहे. काही मोठमोठ्या उद्योगपतींची मुलं आहेत. त्यामुळे थोड्याच वेळात वेगवेगळ्या प्रकारची माहिती आमच्यासमोर येईल. त्यातून आम्ही योग्य त्या नित्कर्षापर्यत पोहचू.

शाहरुखच्या मुलाला आर्यनला (aryan khan) एनसीबीनं ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडे चौकशीही केली आहे. त्या दरम्यानं त्यानं आपल्याला या प्रकरणाची काहीच माहिती नसल्याचं सांगितलं होतं. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा त्याचे व्हाट्स अप चॅट चेक करण्यात आले तेव्हा त्यातून काही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. तो ड्रग्ज घेत असल्याचा खुलासा त्यात केला होता. यासगळ्या प्रकरणाविषयी जेव्हा शाहरुखला समजलं तेव्हा त्यानं तडक भारतात यायचा निर्णय घेतला आहे. तो सध्या स्पेनमध्ये त्याच्या पठाण नावाच्या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त होता. त्यानं आता ते शुटींग रद्द केल्याची माहिती हाती आली आहे.

Mumbai Drug Case: खरा रिपोर्ट समोर येऊ द्या! अभिनेता सुनील शेट्टीचं व्टिट
आर्यनची NCB नं चौकशी केल्याचं कळताच, शाहरुखनं सोडलं पठाणचं शुटींग
Mumbai Drug Case: खरा रिपोर्ट समोर येऊ द्या! अभिनेता सुनील शेट्टीचं व्टिट
शाहरुखच्या मुलाला एनसीबीने घेतलं ताब्यात; चौकशी सुरु

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com