esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai drug case : NCBच्या कारवाईनंतर शाहरुखचा मुलगा चर्चेत

बॉलीवूडमध्ये ड्रग्जने खळबळ; NCBच्या कारवाईनंतर शाहरुखचा मुलगा चर्चेत

Mumbai drug case : NCBच्या कारवाईनंतर शाहरुखचा मुलगा चर्चेत

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई - एनसीबीने शनिवारी रात्री रेव्ह पार्टी करणाऱ्या दहा जणांना अटक केली आहे. यामध्ये मोठ्या बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलाचा समावेश असल्याचंही सांगितलं जात आहे. दरम्यान, या बातमीनंतर सोशल मीडियावर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा ट्रेंड होत आहे. मोठ्या अभिनेत्याचा म्हणजेच शाहरुख खानचा मुलगा आर्यनलाच अटक झाली असल्याचं सांगत त्याबाबत वेगवेगळ्या चर्चा सोशल मीडियावर सुरु आहेत.

एनसीबीच्या पथकाने मंगळवारी क्रूजवर छापा टाकला. यावेळी दहा जणांना ताब्यात घेण्यात आलं असल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कोण आहेत याची माहिती एनसीबीने दिलेली नाही. मात्र समुद्रात क्रूजवर रेव्ह पार्टी सुरु होती हे स्पष्ट केलं आहे.

कार्डेला द इम्प्रेस नावाच्या शिपवर रात्री उशिरा एनसीबीने छापा टाकला. एनसीबीने मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझ जहाजावर चालणाऱ्या ड्रग पार्टीवर छापा टाकला आहे. एनसीबीने दहा जणांना ताब्यात घेतले आहे. यात एका हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्याच्या मुलाचाही समावेश आहे.

हेही वाचा: मोदींना समजते ते राज्यातील भाजपला नेत्यांना समजत नाही का? - संजय राऊत

एक वरिष्ठ पोलिस अधिकारीही या जहाजावर पार्टीत सहभागी होण्यासाठी आला होता. क्रूझवर आठ तासांहून अधिक काळ हा छापा सुरू आहे. तथापि, एनसीबीने अद्याप अधिकृतपणे लोकांची नावे जाहीर केलेली नाहीत. क्रूझवर पकडलेल्यांना NCB कार्यालय मुंबईत आणले जाईल. यानंतर कायदेशीर कारवाई पुढे केली जाईल.

क्रूझ मुंबई सोडून समुद्रात पोहोचताच ड्रग्ज पार्टी सुरु झाली. मात्र या ड्रग्ज पार्टीची कुणकुण या पूर्वी NCB ला लागल्याने NCBच्या टिमने क्रूझवर सापळा रचला होता. पार्टीत ड्रग्ज सेवन केलं जात असल्याचं लक्षात आल्यानंतर ही पार्टी थांबवून क्रूझ पून्हा मुंबई पोर्टवर घेण्यात आलं. कारवाईत छाप्यात सहभागी असलेल्या सर्व एनसीबी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे फोन बंद होते. त्यांना छापे संपेपर्यंत ते बंद ठेवण्यास सांगितले होते.

सोशल मीडियावर शाहरुख खानच्या मुलाचा फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये तो त्याच्या इतर मित्रांसोबत मास्क न घातलेला एक फोटो आहे. तर दुसरा फोटो एनसीबीच्या कारवाईवेळचा आहे. या दोन्ही फोटोंमध्ये एकसारखे कपडे असल्यानं एनसीबीने अटक केलेला शाहरुख खानचा मुलगाच असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. अद्याप एनसीबीकडून या कारवाईबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही.

loading image
go to top