Couple Suicide: आजाराला कंटाळून वृद्ध दाम्पत्याचा आत्महत्येचा प्रयत्न; पत्नीचा मृत्यू, पतीची प्रकृती चिंताजनक

आजारपणाला कंटाळून बोरिवली परिसरात वृध्द जोडप्याचा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना कस्तुरबा मार्ग पोलिसांत नोंदवण्यात आली आहे.
crime news
crime news sakal
Summary

आजारपणाला कंटाळून बोरिवली परिसरात वृध्द जोडप्याचा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना कस्तुरबा मार्ग पोलिसांत नोंदवण्यात आली आहे.

मुंबई - आजारपणाला कंटाळून बोरिवली परिसरात वृध्द जोडप्याचा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना कस्तुरबा मार्ग पोलिसांत नोंदवण्यात आली आहे. या घटनेत वृध्द महिलेचा मृत्यू झाला असून त्यांच्या पतीची प्रकृती चिंताजनक आहे.

बुधवारी 16 नोव्हेंबरला रात्री बोरिवली पूर्व येथे 76 वर्षीय सविता सुर्वे या महिलेचा 77 वर्षीय दत्ताराम सुर्वे या पतीसह जीवन संपवण्याच्या प्रयत्नात झोपेच्या गोळ्या खाल्ल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिलेचे पती दत्ताराम सुर्वे याची प्रकृती चिंताजनक असून त्याना कांदिवली पूर्व येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कस्तुरबा मार्ग पोलिसांनी घरातून दत्ताराम यांनी लिहिलेली सुसाईड नोट जप्त केली आहे.

दीर्घ आजाराने आत्महत्या

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला सविता सुर्वे दृष्टिहीन असून दीर्घ आजाराने अंथरुणाला खिळलेल्या होत्या. त्यांना गेल्या 15-20 वर्षांपासून मधुमेहाचा त्रास होता. दत्ताराम हे गेल्या 25 वर्षांपासून हृदयविकाराने त्रस्त होते. तसेच त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली असून पेसमेकर बसवण्यात आला होता. 2020 मध्ये त्याच्यावर हर्नियाचे शस्त्रक्रिया सुद्धा झाली. दोघेही आपल्या आजारांना कंटाळले होते आणि त्यामुळेच त्यांनी हे पाऊल उचलले असावे अशी पोलीस तपसात माहिती मिळत आहे.

मुलामुळे घटना उघड

त्याच इमारतीत राहणारा या दाम्पत्याचा मुलगा सचिनसुर्वे आई-वडिलांना भेटण्यासाठी त्यांच्या खोलीत गेला. पण दार ठोठावल्यावर कोणीही दार उघडले नाही.त्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला दोघेही पलंगावर मृतावस्थेत आढळून आले. सचिनने दत्ताराम यांना तातडीने रुग्णालयात नेले आणि डॉक्टरांनी त्यांना आयसीयूमध्ये दाखल केले. महिलेला शताब्दी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले जेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

सुसाईड नोट जप्त

कस्तुरबा पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला असून सुसाईड नोट जप्त करण्यात आली आहे. प्रदीर्घ आजारपणामुळे या जोडप्याने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे या चिठ्ठीत नमूद करण्यात आले आहे. अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com