
बुधवारी सायंकाळी एलिफंटा येथील अरबी समुद्रात प्रवासी बोटीला झालेल्या भीषण अपघाताने अनेकांचे आयुष्य बदलून गेले. समुद्र शांत होता, परंतु प्रवाशांच्या किंकाळ्यांनी आणि आक्रोशांनी वातावरण तणावपूर्ण झाले. या दुर्घटनेत १३ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अनेकजण गंभीर अवस्थेत वाचले.