Mumbai Toll rate Hike: आजपासून सर्वसामान्यांच्या खिशावरील भार वाढला! मुंबईकरांना वाढीव टोलचा भुर्दंड

मुंबईमध्ये प्रवेश करणाऱ्या एन्ट्री पॉईंटवरील टोल दरात आजपासून वाढ करण्यात आली आहे
Mumbai Toll rate Hike
Mumbai Toll rate HikeEsakal

मुंबईमध्ये प्रवेश करणाऱ्या एन्ट्री पॉईंटवरील टोल दरात आजपासून वाढ करण्यात आली आहे. मुंबईतील पाचही एन्ट्री पॉईंटवरील टोल आता महाग झाले आहेत. या टोल दराच्या वाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशावरील भार पुन्हा एकदा वाढला आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्यांना आणि मुंबईतून बाहेर जाणाऱ्यांच्या खिशावर हा भार पडणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबईतील प्रवेशद्वारावरील टोलच्या दरांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

टोलवाढीची घोषणा आधीच झालेली आहे. आजपासून त्याची अमलबजावणी सुरु झाली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या टोल नाक्यावर टोल दरवाढ आजपासून (१ ऑक्टोबर) लागू होत आहे. आगामी तीन वर्षांसाठी ही वाढीव किंमत असणार आहे.

टोल व्यवस्थापनाचे कंत्राट देत असतानाच दर ३ वर्षानंतर टोलवाढ होणार असल्याचा करार आहे. त्यानुसार ही नियमीत दरवाढ झाली असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र रस्त्यांवरील सुविधांचा अभाव आहे, त्यातच केलेली टोलवाढ यामुळे काहींनी संताप व्यक्त केला आहे.

Mumbai Toll rate Hike
Mumbai Vehicle Entry : सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार कात्री! आजपासून मुंबईचा वाहन प्रवेश महागणार

कुठे होणार टोल वाढ?

ऐरोली, दहिसर पश्चिम द्रुतगती मार्ग, पूर्व द्रुतगती मार्ग मुलुंड, लाल बहाद्दूर शास्त्री मुलुंड ठाणे, वाशी सायन पनवेल महामार्गावरील टोल नाक्यांवर ही टोल वाढ होणार आहे.

२००२ मध्ये कारसाठी २० रुपये, मिनीबस २५ रुपये, ट्रक बस ४५ रुपये तर अवजड वाहनांसाठी ५५ रुपये टोल होता. यानंतर मागील काही वर्षात यामध्ये सातत्याने वाढ झाली आहे. आता पुन्हा वाढ झाल्याने आणखी एक फटका सर्वसामान्यांना बसणार आहे.

Mumbai Toll rate Hike
Weather Update: राज्यात आजही मुसळधार पावसाचा इशारा; वाचा हवामान विभागाचा अंदाज

वर्ष २०२७ पर्यंत टोल वसूली

टोल चालकांना टोल वसुलीसाठी दिले तेव्हाच दर तीन वर्षांनी टोल दरवाढ केली जाणार असल्याची अधिसूचना आधीच काढली आहे. ज्याप्रमाने १ ऑक्टोंबर पासून मुंबई प्रवेशद्वारावरील टोल नाक्याची दरवाढ केली जाणार आहे. त्याचप्रमाणे १ ऑक्टोंबर २०२६ नंतर पुन्हा टोलदरवाढीचा सामना करावा लागणार असून, वर्ष २०२७ पर्यंत वाढीव टोल भरावा लागणार आहे.

Mumbai Toll rate Hike
Commercial LPG Cylinder Price Hike : सणासुदीच्या काळात महागाईचा मोठा धक्का! एलपीजी गॅस सिलिंडर 'इतक्या' रुपयांनी महागले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com