Mumbai : शिवकालीन शस्त्र व दुर्मिळ नाणी प्रदर्शन

डोंबिवलीकरांनी जागविल्या इतिहासाच्या खुणा
Mumbai Exhibition weapons and rare coins Shiva period Traces history
Mumbai Exhibition weapons and rare coins Shiva period Traces history sakal

डोंबिवली - शिवकालीन तलवारी, ढाल, खंजीर, चिलखत, कट्यार यांसारखी शस्त्रे आणि चलनात वापरण्यात येणारी नाणी डोंबिवलीकरांना प्रत्यक्ष पहाता आली. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त डोंबिवलीत मावळा स्वराज्याचा प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने ऐतिहासिक शस्त्र व नाणी यांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

या प्रदर्शनात शिवकालीन विविध शस्त्रे इतिहासप्रेमींना जवळून पहाता आली. शाळकरी मुलांनी सुट्टीचा दिवस असूनही हे प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली होती.

डोंबिवली पूर्वेतील शिवप्रतिमा हॉलमध्ये मावळा स्वराज्याचा प्रतिष्ठान यासंस्थेच्या वतीने शिवजयंती निमित्त ऐतिहासिक शस्त्र व नाणी यांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

Mumbai Exhibition weapons and rare coins Shiva period Traces history
Shivjayanti: तिथीनुसार शिवजन्मोत्सव सोहळा शिवनेरीवर दिमाखात साजरा

या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे शूरवीर मावळे आणि किल्ले यांची माहिती देण्यात आली आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.

शिवकाळातील तलवारी, कट्यार, चिलखत, वाघनखे, धोप तलवार, पट्टा, ढाल, धनुष्य बाण, भाले, लहान मुलांची शस्त्रे,फरशी, कुऱ्हाड आदि शस्त्रे मांडण्यात आली आहेत.

तसेच मराठा संस्थानिकांची नाणी, संपूर्ण हिंदूस्थानातील मराठ्यांची नाणी देखील मांडण्यात आली आहे.

हे प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी तसेच विद्यार्थ्यांनी पालकांसह उपस्थिती लावली होती.अनेक विद्यार्थी आपल्या पालकांना माहिती विचारुन इतिहास जाणून घेत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com