मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, कारण यंदा पाणी कपात अटळ... 

समीर सुर्वे
शुक्रवार, 31 जुलै 2020

मुंबईला वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते.

मुंबई : मुंबईवर पाणी कपातीचे संकट अटळ झाले असून ऑगस्ट पासून 15 ते 20 टक्के पाणी कपात लागू होऊ शकते. याबाबत आज (शुक्रवार - ३१ जुलै ) रोजी अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात आतापर्यंत 34 टक्के पाणीसाठा जमा आहे. त्यामुळे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कपातीचा प्रस्ताव तयार केला असून त्यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. मुंबईला दररोज 3950 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होत असून पाणी पुरवठ्यात कपात करावी का वेळेत कपात करावी याबात निर्णय होण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी - अन् ठाण्यातील 'त्या' चांदीच्या विटेची आली पुन्हा आठवण

मुंबईत काल सकाळी काही काळ पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. मात्र, आज  हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज असून 1 ते 3 ऑगस्ट काही भागात जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारे भातसा, मध्य वैतरण, मोडकसागर, तानसा ही धरणं ठाणे जिल्ह्यात आहेत. ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्ट पर्यंत हलक्या सरींचा अंदाज असून 2, 3 ऑगस्टला ठाणे पालघरच्या काही भागात जोरदार सरी कोसळतील असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. तर अप्पर वैतरणा हे धरण नाशिक जिल्ह्यात असून तेथे 3 ऑगस्ट पर्यंत हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.

मुंबईला वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते. तर आतापर्यंत 4 लाख 93 हजार 675 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा आहे. गेल्या वर्षी 11 लाख 94 हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा होता. यापुर्वी 2014,2015 मध्ये मुंबईत भरपावसात पाणीकपात झाली होती. तर 2018 नोव्हेबर ते 2019 जूलैपर्यंत पाणी कपात होती. 2009 मध्ये वर्षभर पाणी कपातीची झळ मुंबईला सोसावी लागली होती.

मोठी बातमी - नियमांचा भंग केल्यास होऊ शकते जेल, गणेश विसर्जनाचे नवीन नियम वाचलेत का ?

तलावातील पाणीसाठा (दशलक्ष लिटर मध्ये)  

  • तलाव - पाणीसाठा -- आवश्यक साठा 
  • अप्पर वैतरणा - 39375--27047
  • मोडकसागर --51573---128925
  • तानसा --- 36959---145080
  • भातसा --- 273645---717307
  • विहार - 18551--27698
  • तुळशी -- 8046--8046

mumbai to face watercut because of lack of rainfall this season

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai to face watercut because of lack of rainfall this season