मुंबई : महिला पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कारप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

फेसबुकवर मैत्री करुन लग्नाचं आमिष दाखवून आरोपीनं तिच्यावर बलात्कार केला.
rape case
rape case File photo

मुंबई : फेसबुकवर मैत्री करुन लग्नाच्या आमिषाने एका महिला पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार झाल्याचा खळबळजनक प्रकार नुकताच समोर आला होता. याप्रकरणी संबंधित सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) महिलेनं एका कथित बँक अधिकाऱ्याविरोधात बलात्काराचा आरोप केला होता. (Mumbai FIR has been registered against three accused for raping a female police officer)

एएनआयच्या वृत्तानुसार, "एपीआय महिलेवर बलात्कार करणारा मुख्य आरोपी आणि तिला ब्लॅकमेल करुन त्रास देणाऱ्या दोघांवर अशा तीन आरोपींवर मेघवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी पीडित महिलेनं पवई पोलिसांमध्ये मुख्य आरोपीवर एफआयआर नोंदवला होता.

rape case
शशीकलांशी बोलणाऱ्या 16 नेत्यांची AIADMK कडून हकालपट्टी

पोलिसांच्या माहितीनुसार, मुख्य आरोपी हा मूळचा औरंगाबादचा असून तो फेसबुकच्या माध्यमातून एपीआय महिलेच्या संपर्कात आला. त्यानंतर त्यानं तिला बँकिंग अधिकारी असल्याचं खोटं सांगितलं. पुढे त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर आरोपीनं पीडित महिलेसोबतच्या प्रणयाच्या क्षणाचा व्हिडीओ मोबाइलमध्ये चित्रीत केला आणि नंतर तिला ब्लॅकमेल करत अन्य प्रकारचा त्रास द्यायला सुरुवात केली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ अपलोड करायची धमकी देऊन मुख्य आरोपी आणि त्याचे दोन साथीदार पीडित महिलेला ब्लॅकमेल करत होते. अखेर या त्रासाला कंटाळून पीडित महिला पोलीस अधिकाऱ्याने पवई पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला.

rape case
"अन्यथा मी आत्महत्या करेन, त्यास शिवसेना आमदार जबाबदार असेल"

आयपीसीच्या विविध कलमातंर्गत आरोपी विरोधात फसवणूक आणि बलात्काराचा एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास सुरु असून आरोपींना अद्याप अटक झालेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com