मुंबई : पार्ल्यातील ‘प्राईम मॉल’ला आग

अग्निशमन दलाच्या जवानासह तरुण गंभीर जखमी
पार्ल्यातील ‘प्राईम मॉल’ला आग
पार्ल्यातील ‘प्राईम मॉल’ला आगsakal

मुंबई : विलेपार्ले पश्चिमेकडील ‘प्राईम मॉल’च्या पहिल्या मजल्यावर शुक्रवारी सकाळी आग लागली. ही आग नियंत्रणात आणत असताना अग्निशमन दलाचे जवान मंगेश गावकर जखमी झाले. जखमींत एका २० वर्षीय तरुणाचाही समावेश आहे. मुबासीर मोहम्मद असे त्याचे नाव आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे कूपर रुग्णालयाच्या सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा यांनी सांगितले. दरम्यान, या आगीमागचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.

पाच तासांच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. १० वाजून २८ मिनिटांनी आगीची माहिती मिळाली. त्यानंतर १३ गाड्या, पाण्याचे आठ टँकर दुर्घटनास्थळी दाखल झाले.

आग लागल्यानंतर मुबासीर आत अडकला होता. धुरामुळे त्याचा श्वास गुदमरल्याने त्याला बाहेर पडता आले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला बाहेर काढले. त्यानंतर त्याला कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. आग नियंत्रणात आणत असताना जवान मंगेश गावकर हे जखमी झाले. त्यांच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पार्ल्यातील ‘प्राईम मॉल’ला आग
काँग्रेसकडून उद्या देशभरात 'किसान विजय दिवस', कार्यक्रमांचं आयोजन

मॉलला दुसऱ्यांदा आग?

प्राईम मॉलला याआधीही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. दोन वर्षांपूर्वी या मॉलला आग लागली होती. याबाबत परब यांना विचारले असता त्यावर आताच भाष्य करता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. मॉलला याआधी आग लागली असल्यास त्या वेळी अग्निशमन यंत्रणा सुरू होती की नाही, याचाही तपास केला जाईल, असेही ते म्हणाले.

अग्निप्रतिबंधक यंत्रणा बंद

मॉलच्या पहिल्या मजल्याला आग लागल्यानंतर ती तातडीने नियंत्रणात आणण्यासाठी मॉलमध्ये असलेली अग्निशमन यंत्रणा बंद असल्याने वापरता आली नाही. त्यामुळे आग पसरत गेली, असे अग्निशमन अधिकारी हेमंत परब यांनी सांगितले; मात्र यंत्रणा कार्यान्वित असल्याचे मॉल प्रशासनाने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com