मुंबई : वाडिया रुग्णालयाला आग; अग्निशमनच्या ८ गाड्या घटनास्थळी : Wadia Hospital | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fire

मुंबई : वाडिया रुग्णालयाला आग; अग्निशमनच्या ८ गाड्या घटनास्थळी

मुंबईतील लहान मुलांचं रुग्णालय असलेल्या वाडिया रुग्णालयाला आग लागल्याचं वृत्त आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून युद्धपातळीवर आग विझवण्याचं काम सुरु आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. (Mumbai Fire at Wadia Hospital 8 fire tenders at the spot)

हेही वाचा: USA-China Conflict : चीनच्या 68 विमानांसह, १३ युद्धनौकांनी ओलांडली मेडिअन लाईन

अग्निशमनच्या सुत्रांच्या माहितीनुसार, वाडिया रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील एका वापरात नसलेल्या ऑपरेशन थिएटरमध्ये ही आग लागली असून लेव्हल दोनची ही आग आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दल अॅक्शन मोडमध्ये आलं असून ८ गाड्या तसेच ६ पाण्याचे टँकर घटनास्थळी रवाना झाले आहेत.

हेही वाचा: USA-China Conflict : चीनच्या 68 विमानांसह, १३ युद्धनौकांनी ओलांडली मेडिअन लाईन

दरम्यान, रुग्णालयातील रुग्णालयांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयाला भेट दिली असून परिस्थितीचा आढावा घेतला तसेच प्रशासनाला योग्य त्या सूचना केल्या.

Web Title: Mumbai Fire At Wadia Hospital 8 Fire Tenders At The Spot

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbai NewsfireBMC