
Mumbai: वांद्रे पूर्व येथील ज्ञानेश्वरनगर परिसरात शनिवारी (ता. ४) दुपारी लागलेल्या भीषण आगीत १५ ते २० झोपड्या जळून खाक झाल्या. आगीत झोपड्यांमधील साहित्य जळाले असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली.