ठाकरे सरकारविरोधात 'ते' झालेत आक्रमक! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

म्हणून... ठाकरे सरकारविरोधात 'ते' झालेत आक्रमक!

भारतीय जनता पक्षाने मंगळवारी (दि.25) दुपारी 12 वाजता तुर्भे गावातील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या वेळी राज्यातील ठाकरे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

ठाकरे सरकारविरोधात 'ते' झालेत आक्रमक!

नवी मुंबई : भारतीय जनता पक्षाने मंगळवारी (दि.25) दुपारी 12 वाजता तुर्भे गावातील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या वेळी राज्यातील ठाकरे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी केले. या आंदोलनात भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांची संख्या मोठी होती. महिला पदाधिकाऱ्यांनी हातात फलक घेत फसव्या सरकारविरोधात जोरदार घोषणबाजी केली. 

ही बातमी वाचली का? आघाडी सरकार 'चले जाव'चा नारा

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करू, असे आश्वासन महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी दिलेले होते. मात्र, संपूर्ण कर्जमाफी सोडाच, दोन लाखापर्यंतची कर्जमाफीची रक्कमही अद्याप एकाही शेतकऱ्याला मिळालेली नाही. तसेच अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना रुपये 25 हजार व फळबागांना 50 हजार प्रति हेक्‍टरी मदत देऊ, असे महाआघाडी सरकारचे नेते शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्यावर सांगत होते. मात्र, राज्यपालांनी जाहीर केलेल्या रु. 8 हजार मदतीमध्ये या सरकारने एक दमडीदेखील दिलेली नाही. अशा प्रकारे महाआघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी सांगितले. तसेच राज्यात हिंगणघाटसारख्या घटना घडून महिलांवरील अत्याचार वाढत चालले आहेत. मात्र, हे सरकार आपसातील मतभेद मिटवण्यात वेळ घालवत आहे. महिलांच्या अत्याचाराकडे लक्ष देण्यास व अत्याचार होऊ नये, म्हणून पावले उचलण्यास सरकारला वेळ नाही. अशा प्रकारे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या व महिलांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणाऱ्या या महाआघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. धरणे आंदोलनामध्ये भाजपचे असंख्य कार्यकर्ते व जनता मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. 

ही बातमी वाचली का? राजकन्या भाग्यश्रीचा नवी अविष्कार

भाजपचे हे राज्यव्यापी धरणे आंदोलन असून, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या व महिलांविरुद्ध वाढते अत्याचार रोखण्यात अपयशी ठरलेल्या निष्क्रिय महाआघाडी शासनाविरुद्ध हे आंदोलन करण्यात आले. याद्वारे सरकारचा निषेध करण्यात आला. 
- रामचंद्र घरत, जिल्हाध्यक्ष, भाजप, नवी मुंबई.