
मुंबई : मुंबईच्या जुहू येथील पंचतारांकित हाॅटेलमध्ये ७५ वर्षीय व्यावसायिकाने एका ३५ वर्षीय लेखिकेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी व्यावसायिकावर अंबोली पोलिस ठाण्यात महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी ३७६ (२) एन, ५०४ भा द वि कलमातर्गग गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे व्यापार्याने महिलेला याची वाश्चता कुठेही न करण्यासाठी 'डी कंपनी' ची धमकी दिल्याने पोलिस कामाला लागले आहेत.
९३ च्या मुंबईसाखळी स्फोटाचा मुख्य सूत्रधार कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचे नाव समोर येताच हत्या, खंडणी, धमकी, जिवे मारण्याचा प्रयत्न या सारख्या गंभीर गुन्ह्यांचा पाडाच वाचला जातो. मात्र बलात्काराच्या एका गुन्ह्यात चक्क दाऊदच्या नावाने धमकवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. अंबोली पोलिस ठाण्यात एका ३५ वर्षीय लेखिकेने दिलेल्या तक्रारीनुसार दादरमध्ये राहणार्या एका ७५ वर्षीय व्यावसायिकाने तिच्यावर अंधेरीच्या जेबीनगर येथील सन अॅण्ड शील (आताचे नाव द आॅन टाईम हाॅटेल) येथे मे महिन्यात वेळोवेळी अत्याचार केले आहेत.
याच दरम्यान व्यावसायिकाने तिच्याकडून २ कोटी व्याजाने घेऊन ते परत न केल्याचाही दावा केला आहे. या पैशासाठी त्याच बरोबर महिलेवर केलेल्या अत्याचारबाबत महिलेने आवाज उठवण्याचा प्रयत्न केला असता. व्यावसायिकाने महिलेला थेट कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकावले आहे. अंडरवल्ड डाॅन दाऊद इब्राहिम माझा मित्र असून हाजी मस्तान माझा पत्नीच्या बहिणीचा नवरा होता. याबाबत कुठेही वाश्चता केल्यास जिवे ठार मारण्याची धमकी व्यावसायिकाने दिली असल्याचा दावा महिलेने तक्रारीत केला आहे. या प्रकरणी अंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून हा गुन्हा पुढील तपासासाठी अंधेरी एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग केला आहे. या प्रकरणी पोलिस वस्तुस्थिती पडताळून घेत सखोल तपास करत आहेत.