Mumbai : प्रवासी महिलेसमोर कॅब ड्रायव्हरने केले हस्तमैथुन...आरोपी अटकेत.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Mumbai : प्रवासी महिलेसमोर कॅब ड्रायव्हरने केले हस्तमैथुन...आरोपी अटकेत..

मुंबई : विदेशी महिला नागरिकाचा कॅब ड्रायव्हर कडून अश्लील चाळे करत लैंगिक छळ घडल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे. आरोपी कॅब ड्रायव्हरने महिलेसमोर चालत्या कॅब मध्ये हस्तमैथुन केल्याचा आरोप आहे .डीएन नगर पोलिसांनी चालक योगेंद्र उपाध्याय याला अटक केली आहे.पोलिसांनी आरोपीवर भादवि कलम 354 (A) आणि 509 अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

40 वर्षीय अमेरिकन व्यावसायिक महिला कामानिमित्त एक महिन्यापूर्वी भारतात आली होती आणि तेव्हापासून ती मुंबईत वास्तव्यास आहे. काही कामानिमित्त महिला मुंबई बाहेर गेली होती. शनिवारी पिडीत महिला आणि तिचे सहकारी काम आटोपून मुंबईला परतत होते. घरी जाण्यासाठी महिला आणि तिच्या सहकाऱ्यांनी एक खाजगी कॅब बुक केली होती. अमेरिकन महिला ड्रायव्हरच्या बाजूच्या पुढील सीटवर बसली होते. एक एक करून तिचे सहकारी त्यांच्या गंतव्य ठिकाणी उतरले आता फक्त अमेरिकन महिला आणि आरोपी ड्रायव्हर कॅबमध्ये होते. महिला अंधेरी (पश्चिम) येथे उतरणार होती.

काही वेळाने गाडी चालवताना ड्रायव्हरने महिलेला पाहत वाहनातच हस्तमैथुन करायला सुरुवात केली. काय चालले आहे असा प्रश्न विचारत महिलेने त्याला जेपी रोडवर वाहन थांबवायला सांगितले आणि उतरली. तिने रस्त्यावर आरडाओरडा करायला सुरुवात केली. महिलेच्या आरडाओरडा पाहता तिच्या मदतीला काही लोक धावून आले. इतक्यात तेथील एका व्यक्तीने स्थानिक डीएन नगर पोलिसांना घटनेसंदर्भात माहिती दिली. पोलिस येईपर्यंत जमलेल्या लोकांनी चालकाला रोखून धरले. पोलीस घटनास्थळी पोहोचतच आरोपी कॅब ड्रायव्हरला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेण्यात आले . डी एन नगर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. 40 वर्षीय आरोपी योगेंद्र उपाध्यायचा पूर्वीचा गुन्हेगारी रेकॉर्ड असून तो गोरेगाव येथील रहिवासी आहे