esakal | मुंबई : फोर्ट परिसरातून १७३ पक्ष्यांची सुटका | Birds
sakal

बोलून बातमी शोधा

bird

मुंबई : फोर्ट परिसरातून १७३ पक्ष्यांची सुटका

sakal_logo
By
सकाळ वृ्त्तसेवा

मुंबई : मुंबईच्या फोर्ट (Mumbai Fort) परिसरातील एका घरात पिंजऱ्यात बंद केलेल्या तब्बल १७३ पक्ष्यांची (birds free) वन विभागाकडून (Forest Authorities) सुखरूप सुटका करण्यात आली. हे सर्व पक्षी बेकायदेशीररित्या पिंजऱ्यात (birds in cage) ठेवल्याचा आरोप वन विभागाने केला आहे. वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो आणि वन विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा: कल्याण डोंबिवलीत जोरदार पाऊस

वन विभागाने केलेल्या कारवाईत ११० घार, ४२ पोपट, आठ वटवाघूळ, सात गव्हाणी प्रजातीचे घुबड, दोन बगळे आणि एका सिगल पक्ष्याची सुटका करण्यात आली. फोर्ट परिसरातील क्वीन मॅन्शन या इमारतीत वन विभागाने मंगळवारी केलेल्या कारवाईत प्रदीप डिसूझा यांना वन विभागाने अटक केली. यावेळी डिसूझा यांच्या गच्चीवर कबुतरे, ससे, कोंबड्या तसेच कावळेही पिंजऱ्यात डांबून ठेवल्याचे निदर्शनास आले. १७३ वन्यजीव पक्ष्यांना घरात ठेवण्याची कोणतीही कायदेशीर प्रक्रिया डिसूझा यांनी केली नव्हती. या धाडीत आम्हाला काही वन्यजीव पक्षी मृतावस्थेतही आढळल्याची माहिती मानद वन्यजीव रक्षक सुनिष सुब्रमण्यन कुंजू यांनी दिली.

loading image
go to top