
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी करंदीकर यांचे पती पुरुषोत्तम चव्हाण यांना 24 कोटींच्या फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली आहे. दक्षिण मुंबई आणि लोअर परेल यांसारख्या प्रमुख भागांमध्ये सरकारी योजनांअंतर्गत स्वस्त दरात फ्लॅट्स देण्याच्या आमिषाने अनेकांना फसवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यापूर्वीच चव्हाण 263 कोटींच्या आयकर परतावा घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) तपासात न्यायालयीन कोठडीत होते.