

Mumbai Restaurants Shut as Commercial Gas Shortage Hits City Amid War Tensions
esakal
मुंबई कधीही थांबत नाही, अशी प्रसिद्धी असलेल्या या महानगरात सध्या एक वेगळीच शांतता पसरली आहे. गेल्या दोन दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा पूर्णपणे बंद झाल्याने शहरातील असंख्य हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना आपले दरवाजे बंद करावे लागले आहेत. इराण आणि इस्त्राइल यांच्यातील संघर्षाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर झाला असून, यामुळे खाद्यपदार्थांच्या व्यवसायाला मोठा धक्का बसला आहे. विशेषतः ऑनलाइन फूड डिलिव्हरी सेवांवर याचा काहीसा वाईट परिणाम दिसून येत आहे.