मुंबईत आणखी 4 कोविड सेंटर उभारणार; महापौरांची घोषणा

मुंबईत आणखी 4 कोविड सेंटर उभारणार; महापौरांची घोषणा

मुंबई: सध्या मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढते आहे. रुग्णसंख्येच्या वेगानेच त्यांच्यावर उपचार करणारी यंत्रणादेखील वाढली पाहिजे या विचारातून मुंबईत आणखी 4 ठिकाणी कोविड सेंटर उभारली जात आहेतस अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. ही चार सेंटरप मे महिन्याच्या मध्यापर्यंत सुरू होतील. 5 हजार 300 बेड तर 800 आयसीयू बेड असलेले कोव्हिड सेंटर उभारले जाणार आहेत. कांजूर, मालाड, सोमय्या ग्राउंड आणि महालक्ष्मी अशा चार ठिकाणी MMRDA, CIDCO, MHADA, BMC यांच्याअंतर्गत ही कोविड सेंटर उभारली जाणार आहेत, असंही त्यांनी सांगितले.

अशी असतील चार कोविड सेंटर्स

कांजूरमार्ग (MMRDA) - बेड 2000/ आयसीयू बेड 200
मालाड ( रहेजा ग्राउंड CIDCO) - बेड 2000 / आयसीयू बेड 200 
सोमय्या ग्राउंड (MHADA) - बेड 1000 / आयसीयू बेड 200
महालक्ष्मी (BMC) - बेड 300 / आयसीयू बेड 200 
एकूण - बेड 5300 / आयसीयू बेड 800

"सध्या रेल्वेचे 2 हजार 800 बेड्स रुग्णांसाठी तयार आहेत. पालिकेचे अधिकारी युद्धपातळीवर काम करत आहेत. वरळीत बेड्स वाढवले जातायत. व्हेंटिलेतर, ICU आणि इतर व्यवस्था वाढवली जातेय. वरळीत 2 ते अडीच हजार बेड्स वाढणार आहेत. जिथे गरज असेल, तिथे व्यवस्था उभारली जातेय. त्यामुळे नागरिकांनी वेळ दवडू नये, जिथे मिळेल तिथे रुग्णाला दाखल करा", असा सल्ला त्यांनी दिला.

"रेमडेसीविचा साठा नायर मध्ये आहे. अडीच ते तीन हजार इंजेक्शन्स आहेत. अजून दीड हजार येणार आहेत. खासगी रुग्णालयात साठा नाही. केवळ पालिकेच्या रुग्णालयात साठा आहे. आवश्यकतेनुसार त्याचे डोस दिले जात आहेत." अशी माहिती त्यांनी दिली.

"एप्रिलमध्ये रुग्णांची संख्या वाढतेय. आता 'बचेंगे तो और भी लढेंगे', अशी स्थिती आहे. राजकारण नंतर करता येईल. महापालिकेी जरी आर्थिक स्थिती चांगली नसली, तरी तयारी ठेवावीच लागेल. लोकांना माझी विनंती आहे की सढळ हस्ते सगळ्यांना मदत करा. आमच्या पालिकेत आपण स्वतःचे ऑक्सिजन आणि लिक्विड प्लांट तयार केलेत. लसीच्या बाबतीत देशाने आपल्या लोकांचं आधी पोट भरावं, नंतर इतर ठिकाणी पहावं. आपल्याला लस मुबलक द्यायला हवी.  पंतप्रधान मोदी म्हणालेत की लसीचा उत्सव करायचा आहे. पण आमचा उत्साह वाढवा. असे झालं तर आम्ही लसीचा उत्सव नाही तर उत्सवात लस घेऊ", असंही त्यांनी सांगितलं.

शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीबाबत...

"कालच्या बैठकीबाबत बोलायचं तर त्यात मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, आणि सगळे महत्वाचे नेते उपस्थित होते. सगळ्यांना जनतेच्या हितासाठी निर्णय घ्यायचे आहेत. जनतेचा जीव वाचवणं गरजेचं आहे. त्यादृष्टीने जनहिताचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. सध्याच्या परिस्थितीमुळे आर्थिक बाजू कमकुवत होतेय हे खरं आहे पण विषयाची तीव्रता प्रत्येकाला कळतेय. त्यामुळे आता लवकरच मुख्यमंत्री निर्णयाला पोहोचण्याची शक्यता आहे. कारण आता त्यांच्यावर जबाबदारी आहे", असं त्या म्हणाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com