esakal | घाटकोपरमध्ये 'सेक्सटॉर्शन' रॅकेटचा पर्दाफाश, बिझनेसमॅनचं हनी ट्रॅपिंग
sakal

बोलून बातमी शोधा

Sex racket.jpg

घाटकोपरमध्ये 'सेक्सटॉर्शन' रॅकेटचा पर्दाफाश

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: घाटकोपरमध्ये (ghatkopar) पोलिसांनी सेक्सटॉर्शनच्या (sextortion racket) रॅकेटचा पदार्फाश केला आहे. यामध्ये बिझनेसमॅनला आधी हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढलं जायचं. त्यानंतर त्यांना ब्लॅकेमेल करुन, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात रक्कम उकळली जायची. साहील नादर, रणजीत मोरे आणि अरबाज खान या तिघांना अटक (accused arrested) करण्यात आली आहे. त्यांनी किडनॅपिंगसाठी वापरलेली गाडी सुद्धा जप्त करण्यात आली आहे. पीडित व्यक्तीने तक्रार नोंदवल्यानंतर शबनम दिवेकर ही बेपत्ता झाल्याचे पोलिसांनी सांगितले. (Mumbai ghatkopar Trio nabbed in sextortion racket one on the run)

काय होती पद्धत?

या गँगची काम करण्याची पद्धत एकदम वेगळी होती. सावज हेरल्यानंतर सोशल मीडियावरुन ही गँग बिझनेसमॅनशी मैत्री करायची. व्हिडीओ कॉलवरुन बोलणे झाल्यानंतर भेटायला बोलवायचे. भेटण्याची जागा ही हॉटेल रुममध्ये असायची. तिथे मुलगी जे सावज आहे, त्याच्याबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करायची. दोघे हॉटेलच्या रुममध्ये असताना गँगचे सदस्य अचानक तिथे दाखल व्हायचे. मुलीचा नवरा, नातेवाईक बनून तिथे पोहोचायचे. तिथे त्या बिझनेसमॅनला मारहाण करायचे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

बलात्काराची तक्रार दाखल करण्याची धमकी द्यायचे आणि पैशांची मागणी करायचे. असल्फा येथे राहणारा एक बिझनेसमॅन शबनम दिवेकरच्या जाळ्यात फसला. काही दिवसात त्यांचे बोलणे सुरु झाले आणि रविवारी एका लॉजवर भेटायचं दोघांमध्ये ठरलं. तिथे बिझनेसमॅनने शबनम दिवेकर बरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित केले. सेल्फी काढले असे जितेंद्र आगरकर यांनी सांगितले.

हेही वाचा: मुंबईत लसीकरणाच्या बाबतीत पहिल्यांदाच घडतेय एक मोठी गोष्ट

बिझनेसमॅन आणि शबनम दिवेकर जिने उतरुन खाली येत असताना, गँगच्या सदस्यांनी बिझनेसमॅनला पकडून मारहाण केली. अश्लील फोटो दाखवले व बलात्काराची तक्रार दाखल करण्याची धमकी दिली. "बिझनेसमॅन घाबरल्यानंतर आरोपी त्याला गाडीत टाकून कल्याणला घेऊन गेले. तिथे त्यांनी त्याच्याकडे १ लाख रुपयांची मागणी केली" असे डीसीपी प्रशांत कदम यांनी सांगितले. पीडित व्यक्तीने तात्काळ १० हजार रुपये दिले व उर्वरित रक्कम घरी पोहोचल्यावर देईन असे सांगितले. त्यानंतर त्या बिझनेसमॅनने रविवारीच पोलीस ठाणे गाठले व घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार केली.