esakal | डिसेंबर २०२२ पर्यंत मुंबई- गोवा महामार्गाचे चौपदरीकरण होणार पूर्ण : PWD
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai goa highway

डिसेंबर २०२२ पर्यंत मुंबई- गोवा महामार्गाचे चौपदरीकरण होणार पूर्ण : PWD

sakal_logo
By
सुनिता महामुनकर

मुंबई : मागील काही वर्षांपासून सुरू असलेले मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai- Goa highway) चौपदरीकरणाचे (Four lane Road) काम टप्प्याटप्याने पूर्ण होत असून इंदापूर ते झाराप (सिंधुदुर्ग) दरम्यान ३५५ किमी पैकी २०६ किमीचे काम पूर्ण झाले असून एकूण ६२ टक्के काम झाले आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (PWD) गुरुवारी प्रतिज्ञापत्राद्वारे मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) सांगण्यात आले. संपूर्ण काम डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण होईल, असा दावा यामध्ये केला आहे. ( Mumbai Goa highway four lane construction completes in December 2022 says PWD)

मुंबई-गोवा महामार्गावर रस्त्याची दुर्दशा झाली असून अद्याप दुरुस्ती काम आणि चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले नाही, असे निदर्शनास आणणारी जनहित याचिका वकील ओवेस पेचकर यांनी केली आहे. यावर राज्य सरकार कडून आज प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. यानुसार काम साठ टक्के पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या महामार्गावर वाहतूक सुरू असून उर्वरित काम चालू आहे. साधारण पणे डिसेंबर 2022 पर्यंत चौपदरीकरणाचे काम पूर्ण होईल असेही यामध्ये स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: CKP बँकेतील भागधारकांच्या हक्कासाठी संघर्ष समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव

महामार्गाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल आकारणार नाही, तसेच वशिष्ठी नदीवरील नवीन पुलाचे काम ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार आहे, असे यामध्ये म्हटले आहे. तसेच या पुलावरील दोन मार्ग वाहनचालकांसाठी सुरू ठेवण्यात येणार आहे, असे ही सागण्यात आले आहे. याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे.

loading image