

Mumbai-Goa Highway Delayed for 17 Years with 5,500 Crore Cost Overrun
Sakal
मुंबई : मुंबईला गोव्याशी जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६च्या चौपदरीकरणाला मंजुरी मिळून १७ वर्षे झाली, तरी हा प्रकल्प अद्यापही रेंगाळलेलाच आहे. माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, या विलंबाच्या कारभारामुळे प्रकल्पाचा खर्च ५,५०० कोटींनी वाढला आहे. एकीकडे हा महामार्ग कोकणवासीयांसाठी जीवघेणा ठरत असून अपघातातील मृत्यूंचा आकडा वाढतोय. तर दुसरीकडे गणेशोत्सवासारख्या सणासुदीच्या काळात लाखो प्रवाशांचे हाल होत आहेत.