Mumbai-Goa Highway: सुकेळी खिंडीत टोलधाड, नागोठणे पुलाची दुरुस्ती अंतिम टप्प्यात, गणेशोत्सवानंतर सुरू होणार

Sukeli Khind Toll Plaza: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सुकेळी खिंडीत टोलनाका उभारण्यात आला आहे. या टोलनाक्यावरून गणेशोत्सवानंतर टोलवसुली सुरू केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Sukeli Khind Toll Plaza

Sukeli Khind Toll Plaza

ESakal

Updated on

महेंद्र दुसार

अलिबाग: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कासू ते इंदापूर या ४२.३ किलोमीटरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सुकेळी खिंडीत उभारण्यात आलेल्या टोलनाक्यावरून गणेशोत्सवानंतर टोलवसुली सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागोठणे उड्डाणपुलावरील दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आले असून, टोल प्लाझाचे बांधकामही पूर्ण झाले आहे. त्यामुळे आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होताच टोलवसुली सुरू करण्याच्या हालचाली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वेगवान केल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com