Mumbai : गोरेगांव मध्ये अमली पदार्थ तस्कर अटकेत 20 लाखांचे अमली पदार्थ जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

Mumbai : गोरेगांव मध्ये अमली पदार्थ तस्कर अटकेत 20 लाखांचे अमली पदार्थ जप्त

मुंबई : मुंबईच्या दिंडोशी पोलीस स्टेशनने रविवारी संध्याकाळी एका 39 वर्षीय अमली पदार्थ तस्कराला अटक केली असून आरोपीकडून 20 लाखांचे अमली पदार्थ जप्त केले आहे. आरोपीला कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याला 1 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. गोरेगाव परिसरातील संतोष नगर येथे एक व्यापारी अंमली पदार्थ व्यवहार करण्यासाठी येत असल्याची गुप्त माहिती दिंडोशी पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपी तस्कराला अटक करण्यात आली.

आरोपीकडून एमडी नावाचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, आरोपीने ड्रग्ज कुठून आणले होते आणि तो कोणाला पुरवणार होता याचा पोलीस तपास करत आहे.