मुंबईत रूग्णवाढीचा दर 1.05 वर! गेल्या 24 तासात 2,261 नवीन रुग्णांची भर

मिलिंद तांबे
Sunday, 27 September 2020

मुंबईत आज 2,261 रुग्ण सापडले. मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,98,720 झाली आहे.

मुंबई : मुंबईत आज 2,261 रुग्ण सापडले. मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,98,720 झाली आहे. रूग्णवाढीचा दर 1.07 टक्क्यांवरून कमी होऊन 1.05 वर खाली आला आहे. मुंबईत आज 44 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 8,791 वर पोचला आहे. मुंबईत आज 4,190 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 82 टक्के इतका झाला  आहे.                                                

हवाई दलाच्या तळाजवळ इमारतींना परवानगी कशी? भाजपचा ठाणे पालिकेला सवाल 

मुंबईत आज नोंद झालेल्या 44 मृत्यूंपैकी 38 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 30 पुरुष तर 14 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 44 रुग्णांपैकी एकाचे वय 40 च्या खाली होते.8 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते तर 35 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते.                 

आज 4,190 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत 1,62,939 रुग्णांना घरी सोडण्यात आले.मुंबईत रुग्ण दुपटीचा दर वाढून 66 दिवसांवर गेला आहे. तर 26 सप्टेंबर पर्यंत एकूण 10,82,329  कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर 20 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर 1.05  इतका आहे. 

 

शेतकरी कायद्याविरोधात काँग्रेसतर्फे सोमवारी राज्यपालांना निवेदन; आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार

मुंबईत 676 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 10,289 असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात असलेले 11,952 अति जोखमीचे रुग्ण आहेत तर 1,960 रुग्ण कोविड केअर सेंटर 1 मध्ये उपचार घेत आहेत.

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Mumbai the growth rate is 1.05 Today 2261 new patients were added