लॉकडाऊनसंदर्भात मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांचं मोठं वक्तव्य

लॉकडाऊनसंदर्भात मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांचं मोठं वक्तव्य

मुंबई:  महाराष्ट्रात सध्या कोरोना रुग्णांची संख्या ही चिंताजनक आहे. त्यासाठी राज्यात आजपासून कडक निर्बंध लागण्याची शक्यता असल्याचं वक्तव्य मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केलं आहे. शिवाय इतर राज्यांमध्ये गेलेल्या लोकांना महाराष्ट्रात परतायचा असेल तर त्यासाठी देखील निर्बंध असतील, असंही त्यांनी सांगितलं. त्या लोकांसाठी SOP लावण्यात आले असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. त्याच्यामुळे ब्रेक चेनसाठी महाराष्ट्र तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. अस्लम शेख यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. तसंच आज राज्य सरकार मोठा निर्णय घेणार असल्याचं मोठं वक्तव्यही त्यांनी केलं आहे. 

लॉकडाऊन लावायचा की नाही हा सरकारचा अंतिम निर्णय आहे. तो लावू नये हा सरकारचा मानस आहे. टास्क फोर्स आणि अधिकारी, व्यापारी, इंडस्ट्रीतल्या लोकांची मत जाणून घेतली. महाराष्ट्रात मोठा आकडा यासाठी आहे की आपण लोकांच्या टेस्ट  करतो. इतर राज्य टेस्ट करत नाही म्हणून कोर्ट त्यांच्यावर ताशेरे ओढत आहे, असंही अस्लम शेख यांनी आपल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. 

आपण फॅसिलिटी वाढवत आहोत असं सांगत ब्रेक द चेनसाठी प्रयत्न आहे. आज राज्य सरकार मोठा निर्णय घेणार आहे, असं मोठं वक्तव्य आज अस्लम शेख यांनी केलं आहे. तसंच लोकांचे विचार आणि मत घेऊन निर्णय घेत आहोत. आज मुख्यमंत्री निर्णय घेतील अशी शक्यता आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान महाराष्ट्र आणि मुंबईत परिस्थिती हाताबाहेर गेली नाही. आपल्या फॅसिलीटी पाहून इतरांनी तशा फॅसिलिटी वाढवल्या आहेत. आपल्याकडे ऑक्सिजन बेड उपलब्ध आहे. 70 टक्के ऑक्सिजन आणि ICU बेड तयार करणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली. आज SOP तयार करून आज मुख्यमंत्री निर्णय देतील अशी माहिती मिळत आहे. किती दिवस लॉकडाऊन करायचं याबाबत निर्णय लवकरच होईल. काय करायला हवं आणि काय नको प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागत असल्याचंही ते म्हणालेत. 

लोकांची परिस्थिती फार बिकट होता कामा नये. जे जे राज्य बदनामीमुळे टेस्ट करत नाही त्यांची परिस्थिती एका आठवड्यानं बघा असंही पालकमंत्री म्हणाले आहेत. आपल्या राज्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जात आहे. पहिल्यांदा जेव्हा लॉकडाऊन करण्यात आलं तेव्हा अचानक केंद्र सरकारकडून आदेश आले होते. त्यामुळे त्यावेळची परिस्थिती ही केंद्रामुळे झाली होती, असं पालकमंत्र्यांनी म्हटलं आहे. 

आपल्या राज्यात असं होऊ नये म्हणून आपण सर्व स्तरांशी बोललो आहोत. ट्रेन, बसेस, रिक्षा, एसटी आपण सुरु ठेवली आहे. ५० टक्के प्रवासाची मुभा दिली आहे, असंही अस्लम शेख यांनी सांगितलं आहे.

Mumbai Guardian Minister aslam shaikh big statement regarding state lockdown

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com