esakal | ''कोरोनाला रोखायचं असेल तर...''; टास्क फोर्सच्या प्रमुखांनी सांगितला उपाय

बोलून बातमी शोधा

''कोरोनाला रोखायचं असेल तर...''; टास्क फोर्सच्या प्रमुखांनी सांगितला उपाय

वाढत्या कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी सोयीसुविधांवर भर देणे महत्वाचे आहे.

''कोरोनाला रोखायचं असेल तर...''; टास्क फोर्सच्या प्रमुखांनी सांगितला उपाय
sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई: वाढत्या कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी सोयीसुविधांवर भर देणे महत्वाचे आहे. बेड उपलब्ध करणे,आयसीयू-ऑक्सिजनची व्यवस्था उभी करून लसीकरणाचा वेग वाढवून सुविधा वाढवण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे मत राज्य टास्क फोर्सच्या अनेक सदस्यांनी व्यक्त केले. मात्र राज्यातील परिस्थिती लक्षात घेऊन सरकार योग्य निर्णय घेईल असे ही त्यांनी सांगितले. मात्र बेड,आयसीयू,ऑक्सिजन, वैद्यकीय कर्मचारी आणि औषध यांची पंचसूत्री ही महत्त्वाची असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी  सांगितले. 

कोरोना संसर्ग थोपवायचा असेल तर लसीकरण हा योग्य पर्याय असल्याचे राज्य टास्क फोर्सचे प्रमुख डॉ संजय ओक यांनी सांगितले. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 80 टक्के लसीकरण पूर्ण व्हायला हवे. यासाठी कोरोना संसर्ग अधिक असणाऱ्या ठिकाणी लसीकरण केंद्र वाढवण्यावर भर देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याशिवाय लसीकरण झालेल्या लोकांनीही सुरक्षेचे सर्व उपाय पाळायला हवेत. तसेच राज्यात पुढील दोन महिन्यात अधिकाधिक लसीकरण करायला हवे. तरच आपण या लढाईत कोरोनाला हरवू शकू असे ही डॉ संजय ओक यांनी सांगितले. 

हेही वाचा-  कोरोना रिपोर्टच्या वेळेबाबत आयुक्तांकडून खासगी लॅबला विशेष सूचना

कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी कोरोनाची साखळी खंडित करणे महत्वाचे असल्याचे डॉ अविनाश सुपे यांनी सांगितले. त्यासाठी मिनी लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध लावायला हवेत, असं ही डॉ. सुपे म्हणाले. रुग्ण सेवेवर ताण येत असेल तर कठोर निर्बंध लावायलाच हवेत असंही त्यांनी सांगितलं.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सध्याच्या परिस्थितीत  कडक निर्बंध लावण्याची गरज आहे. रेल्वे प्रवासातही बदल करण्याची गरज आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील ट्रेंड पाहता मृत्यू दर कमी आहेत. पण मृत्यू दर वाढू शकतो. राज्यातील काही भागात मृत्यूचं प्रमाण अधिक आहे. काहीच भागात मृत्यूचं प्रमाण अधिक का आहे? याचा आम्ही अभ्यास करत आहोत, असं सुपे यांनी सांगितलं.

कोरोना संसर्ग वाढल्याने सर्व रुग्णालयावर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर ताण आला आहे. लॉकडाऊनचा पार्याय आपण मागच्या वेळी पाहिला. मात्र त्यानंतर कोरोनाची दुसरी लाट ही आली. त्यामुळे निर्बंध अधिक कडक करणे गरजेचे असल्याचे डॉ जलील पारकर यांनी सांगितले. सर्व रुग्णालये खचाखच भरली आहेत. आयसीयू, ऑक्सिजन बेडसह रेमडेमसीविर सारखी इंजेक्शन उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.  त्यामुळे रुग्णालये तसेच कोविड केंद्रांतील सुविधा वाढवायला हव्यात. शिवाय लोकांमध्ये जनजागृती करणे ही गरजेचे असल्याचे पारकर म्हणाले. लोकांनी ही सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले तर लॉकडाऊनची वेळ येणार नाही असे ही डॉ पारकर यांनी सांगितले.

----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

state task force head Sanjay Oak vaccination right option corona infection