मुंबईत रुग्णसंख्यावाढीचे थैमान; नवीन 2,352 कोरोना रुग्णांची भर; वाचा इतर सविस्तर आकडेवारी

मिलिंद तांबे
Wednesday, 16 September 2020

मुंबईत बाधित रुग्णांचा आकडा पुन्हा एकदा दोन हजारच्या वर गेला असून आज 2,352 रुग्ण सापडले.

मुंबई : मुंबईत बाधित रुग्णांचा आकडा पुन्हा एकदा दोन हजारच्या वर गेला असून आज 2,352 रुग्ण सापडले. मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,75,886 झाली आहे. रूग्णवाढीचा दर 1.28 टक्क्यांवर स्थिर आहे. मुंबईत आज 50 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 8,277 वर पोचला आहे. मुंबईत आज 1,500 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 77 टक्के इतका आहे.                                                

BMCतील समित्यांच्या निडणुकीत भाजपची भूमिका निर्णायक! विरोधकांची बार्गेनिंग पावर वाढणार

मुंबईत आज नोंद झालेल्या 50 मृत्यूंपैकी 31 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 37 पुरुष तर 13 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 50 रुग्णांपैकी दोघांचे वय 40 वर्षा खालील होते.  37 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते तर 11 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते.                   

मराठा आरक्षण : सर्वपाक्षीय बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडलेल्या गोष्टी आणि फडणवीसांनी मांडलेले मुद्दे

आज 1,500 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत 1,35,566 रुग्णांना घरी सोडण्यात आले.मुंबईत रुग्ण दुपटीचा दर हा 55 दिवसांवर गेला आहे. तर 15 सप्टेंबर पर्यंत एकूण 9,50,112  कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर 9 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर 1.28 वर स्थिर आहे. 

 

मराठा आरक्षणाचे नेतृत्व खासदार संभाजीराजे भोसले यांनी करावे; शिवसेनेची लेखी मागणी

मुंबईत 601 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 8,992 असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात असलेले 13,583 अति जोखमीचे रुग्ण आहेत तर 2,422 रुग्ण कोविड केअर सेंटर 1 मध्ये उपचार घेत आहेत.

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai has a growing number of patients of corona

टॉपिकस
Topic Tags: