
मुंबई : मुंबईच्या एकूण मृत्युदराच्या तुलनेत कर्करोगाच्या रुग्णांमध्ये कोव्हिड- 19 मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. परळच्या टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या आकडेवारीनुसार, कोरोनामुळे कर्करोगाच्या रुग्णांचा मृत्युदर 9.8 टक्के आहे. मुंबईतील मृत्युदरापेक्षा तो तिपटीने जास्त (3.9 टक्के) आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे त्यांना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. दरम्यान, सिगारेटचे तुलनेने कमी प्रमाणत सेवन होत असल्यामुळे, आपल्याकडील कर्करोगग्रस्तांचे मृत्यूचे प्रमाण पाश्चात्त्य देशांपेक्षा कमी आहे.
टाटा रुग्णालयातर्फे तीन कोव्हिड सेंटर सुरू करण्यात आली आहेत. तिथे 1,140 कर्करोगाच्या रुग्णांना कोरोनाच्या संसर्गावर उपचार देण्यात आले आहेत. त्यापैकी 112 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 50 पेक्षा जास्त वयाच्या रुग्णांमध्ये कोरोना मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. दरम्यान, ऑन्कोलॉजिस्टच्या मते, पाश्चात्त्य देशांच्या तुलनेत सह-संक्रमित कर्करोगाच्या रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण भारतात कमी आहे. सिगारेटचा थेट परिणाम फुप्फुसावर होतो. भारतात तंबाखू खाणाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्याने त्यांचे फुप्फुस आरोग्यदायी राहते. त्यामुळे त्यांना कोव्हिड- 19 च्या संसर्गापासून वाचवण्यात यश आले. ऑगस्ट 2020 मध्ये "लॅन्सेट'ने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, रक्त कर्करोगाने ग्रस्त रुग्णांना कोरोना संसर्गाची लागण सर्वात जास्त झाली आहे.
आकडेवारीनुसार 2,59,114 जण मुंबईत कोव्हिडच्या संपर्कात आले. त्यापैकी 10,305 जण बळी पडले. दुसरीकडे, टाटा रुग्णालयात दर वर्षी 70,000 कर्करोगाचे रुग्ण आढळतात. मार्च ते ऑक्टोबरदरम्यान कोव्हिड सह-संसर्ग झालेल्या 1,140 कर्करोगाच्या रुग्णांवर उपचार केले गेले. त्यांपैकी 112 रुग्णांना उपचारादरम्यान मृत्यू झाला. ज्येष्ठ ऑन्कोलॉजिस्टच्या मते, कर्करोगाच्या रुग्णांना रोगप्रतिकारक शक्तीच्या कमतरतेमुळे विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. त्यांच्या मृत्यूची संख्याही जास्त असते. रोग प्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्या रुग्णांमध्ये संक्रमणास विरोध करणाऱ्या शरीराच्या पांढऱ्या रक्तपेशी कमी होतात किंवा कार्य करत नाहीत. त्यामुळे प्रभावीपणे संक्रमणाशी लढण्यासाठी शरीर अपयशी ठरते.
कर्करोगाच्या रुग्णांमध्ये विशेषत: ज्यांच्यावर केमोथेरपी सुरू आहे त्यांना संसर्गाची लागण सर्वात धोकादायक असते. शिवाय 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या रुग्णांमध्ये संसर्ग आणि मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. जर त्यांना इतर आजार असतील, तर त्यांचा संसर्ग अधिक प्राणघातक होतो.
- डॉ. सी. एस. प्रमेश,
संचालक, टाटा रुग्णालय
Mumbai has the highest mortality rate among cancer patients
--------------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.