अत्यंत महत्त्वाचं निरीक्षण, मुंबईमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये अतिजोखमीचे आजार असलेले रुग्ण सर्वाधिक

भाग्यश्री भुवड
Monday, 30 November 2020

मुंबईमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये अतिजोखमीचे आजार असलेल्या रुग्णांचे सर्वाधिक बळी गेले आहेत.

मुंबई, 30 : मुंबईमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये अतिजोखमीचे आजार असलेल्या रुग्णांचे सर्वाधिक बळी गेले आहेत. त्यामुळे, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर उच्चरक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, स्थूलता, अस्थमा असे आजार असणाऱ्या व्यक्तींनी अधिक खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे निरीक्षण टास्क फोर्सच्या तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

महत्त्वाची बातमी : "माझी फाईल पुढेच जात नाही", धावपटू कविता राऊत यांनी राज्यपालांकडे केली तक्रार

मुंबईत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण 10 हजार 739 मृत्यूंपैकी 55 टक्के लोकांचा मृत्यू उच्च रक्तदाबामुळे तर 50 टक्के मधुमेहामुळे झाला आहे. त्यामुळे वाढती रुग्णसंख्या आणि हिवाळ्याचे बदलते वातावरण याच्या पार्श्वभूमीवर मृत्यूदर कमी होण्यासाठी अधिक काळजी घेतली पाहिजे, असे मत टास्क फोर्सचे तज्ज्ञ डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केले आहे.

महत्त्वाची बातमी :  २०१५ साली मुंबई- उपनगरात सर्वाधिक मृत्यू प्रमाण, माहिती अधिकारातून बाब उघड

अतिजोखमीचे आजार असणाऱ्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्यास गुंतागुंत निर्माण होऊ शकते. शिवाय, कोरोनामुक्त झाल्यानंतरही पूर्ण बरे वाटेपर्यंत अधिक काळ जावा लागतो. त्यामुळे अतिजोखमीचे आजार असणाऱ्या व्यक्तींनी मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे वा स्वच्छता, सॅनिटायझरचा वापर करणे या सवयी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत, अशी माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली आहे. 

महत्त्वाची बातमी : "ED आणि CBI ला चीन आणि पाकिस्तानची सुपारी देऊन सीमेवर पाठवा"; शिवसेनेची केंद्रावर जहरी टीका

दिवाळीपूर्व उतरणीला आलेला कोरोनाचा आलेख दिवाळीनंतर पुन्हा वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर महापालिकेने एकीकडे चाचण्यांची संख्या वाढवली असतानाच, दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर 83 हजार कोमॉर्बिड रुग्णांवर (अतिजोखमीचे) लक्ष केंद्रीत केले आहे.

( संपादन - सुमित बागुल )

Mumbai has the highest number of patients with high risk of coronary heart disease


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai has the highest number of patients with high risk of coronary heart disease