मुंबई : २९ वर्षीय तरुणाच्या दुर्मिळ आजारावर यशस्वी शस्त्रक्रिया

Mumbai Doctors
Mumbai Doctorssakal media

मुंबई : भारतामध्ये अनेकवेळा जन्मजात असलेले दोष दुर्लक्षित केल्यामुळे प्रौढावस्थेत (Ephebic) त्याचा त्रास होऊन गंभीर आजार (Serious decease) होण्याच्या घटना समोर आल्या आहेत.  आजार समोर आल्यावरही त्यावर योग्य ते उपचार (treatment) केले जात नाही व डॉक्टरांच्या दिरंगाईमुळे (doctors irresponsibility) रुग्णाला बरे वाटत नाही.

Mumbai Doctors
मांडा-टिटवाळ्यात 31 वीज चोरांविरुद्ध गुन्हा दाखल

कल्याणमधील 29 वर्षीय रामसिंगला एक जन्मजात अत्यंत दुर्मिळ असा आजार आढळून आला होता आणि त्याच्यावर घाटकोपर येथील एका खासगी रुग्णालयात योग्य निदान झाल्यामुळे त्यावर योग्य उपचार करणे शक्य झाले. रुग्णालयाचे बॅरिएट्रिक सल्लागार  आणि जीआय सर्जन डॉ. जयदीप पालेप व लॅप्रोस्कॉपिक व जीआय सर्जन डॉ. निधी खंडेलवाल यांनी रामसिंगवर यशस्वी उपचार केले.

रामसिंगला इवेन्ट्रेशन ऑफ डायफ्राम हा दूर्मिळ आजारा झाला होता. याविषयी जीआय सर्जन डॉ. जयदीप पालेप यांनी सांगितले की, ही एक दुर्मिळ वैद्यकीय स्थिती आहे. डायफ्राम म्हणजे  छातीच्या पोकळी आणि उदरपोकळी दरम्यान स्नायूंचा सेप्टम आहे. जो  श्वासोच्छवासाचा मुख्य स्नायू आहे. जो उदर आणि छातीची पोकळी वेगळे करतो. मात्र, या केसमध्ये डायफ्रामला भेदून पोट आणि कोलन सारख्या पोटातील सामग्री छातीमध्ये सरकली होती. त्यामुळे रामसिंगला उलट्या होणे, धाप लागणे अशी लक्षणे वांरवार दिसत होती.

Mumbai Doctors
आणखी एका साक्षीदाराची पलटी, समीर वानखेडेंच्या अडचणी वाढल्या

हा आजार जन्मजात असून जर त्यावेळी उपचार केले असते तर त्याला कोणताही त्रास झाला नसता. परंतु, हा आजार वयाच्या 29 व्या  वर्षापर्यंत दुर्लक्षित राहिला व या आजारावर जर उपचार झाले नाही तर फुफ्फुसाचे कायमचे नुकसान होऊ शकते. यामध्ये सिटी स्कॅन व इतर वैद्यकीय चाचण्या करून त्याचे योग्य निदान झाले व त्यावर लॅप्रोस्कॉपीक शस्त्रक्रिया करून त्याचे प्राण वाचवले. लॅप्रोस्कॉपीक व जीआय सर्जन डॉ.निधी खंडेलवाल यांनी सांगितले की, या केसमध्ये  शस्त्रक्रिया करून सुधारणा आवश्यक होते ज्यामध्ये डायफ्रामवर  टाके घालून त्याला पुन्हा सामान्य जागी आणले जाते. पारंपारिक वैद्यकीय क्षेत्रात ही शस्त्रक्रिया छाती आणि पोटावर मोठ्या चीरांसह केली जाते आणि रुग्ण बरे होण्यास एक महिन्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो.

पण, या केसवर मिनिमली इनव्हेसिव्ह शस्त्रक्रिया, म्हणजे कीहोल लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली. ओटीपोटावर फक्त 4 लहान कट होते आणि  शस्त्रक्रियेनंतर रामसिंगच्या  श्वासोच्छवासात त्वरित सुधारणा झाली.  शस्त्रक्रियेनंतर केलेल्या छातीच्या एक्स-रेमध्ये डायफ्राम सामान्य स्थितीत दिसून आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com