अलकापा नावाच्या दुर्मिळ ह्रदय रोगावर मुंबईत यशस्वी शस्त्रक्रिया | Mumbai health update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

heart disease patient

अलकापा नावाच्या दुर्मिळ ह्रदय रोगावर मुंबईत यशस्वी शस्त्रक्रिया

मुंबई : पंढरपुर येथे स्थानिक असणाऱ्या 53 वर्षीय महिलेवर मुंबईतील लिलावती रुग्णालयात (lilavati hospital) अलकापा नावाच्या दुर्मिळातल्या दुर्मिळ हृदय रोगावर (alcapa heart disease) उपचार करण्यात डाॅक्टरांना यश (successful surgery) आले आहे. अलकापा या आजाराला ब्लेंड व्हाईट गारलँड सिंड्रोम असेही म्हटले जाते.

हेही वाचा: "एसटी कर्मचारी उपाशीपोटी काम करी अन् आदित्य ठाकरेंची स्कॉटलँड वारी"

यात धमन्यांमुळे विचित्र हृदयरोगाचे निदान होते. हृदयाच्या कोरोनरी धमन्या या पल्मनरी आर्टरी मधून उत्पन्न झाल्याने हृदयाच्या स्नायूंचे नुकसान होऊन तिथे इजा होते. 3 लाख ह्रदय रुग्णांमध्ये एक असे या आजाराचे प्रमाण आहे. त्यामुळे हा आजार दुर्मिळ असून यावरील उपचार ही अवघड ठरतात. शिवाय, जगभरात फक्त 165 रुग्ण या आजारांनी आतापर्यंत नोंदले गेले आहेत.

जन्मजात ह्रदयातील आजारांची ही एक दुर्मिळ विसंगती आहे. या  ह्रदयाच्या जन्मजात विकारात डावी कोरोनरी धमनी साधारण जागेच्या म्हणजेच एओर्टाच्या जागेऐएवजी पल्मनरी आर्टरी मधून उत्पन्न होत असल्याने हृदयाच्या स्नायूंचे नुकसान होते. या कारणामुळे डाव्या कोरोनरीत शुद्ध रक्त पुरवठा पद्धतीत अशुद्ध रक्त पुरवठा होऊ लागतो. यातुन हृदयाच्या कामावर दाब पडतो. ह्दयाचे ठोके अनियमित होतात. हार्ट अटॅक येतो आणि योग्य वेळी उपचार आणि निदान न झाल्यास जन्मानंतर 1 वर्षाच्या आतच अवेळी मृत्यू ओढावतो.

95 टक्के अलकापाचे रुग्ण हे लहान मुले असतात. आणि यांना हृदयाच्या शस्त्रक्रिया करुन वाचवले जाते. वेळेत निदान न झाल्यास फक्त 5 रुग्णच पन्नाशी गाठतात. त्यांच्यातीलच एक नशीबवान दिलशाद मुलाणी ही महिला मूळची महाराष्ट्रातील पंढरपूर येथील आहे. तिला जन्मापासूनच हा गंभीर आणि अत्यंत दुर्मिळ हृदयविकार होता आणि याबाबत तिला माहीतच नव्हते. तिला श्वास घेण्यास त्रास होत होता आणि अधूनमधून छातीत दुखत होते.

हेही वाचा: मुंबई : टाटा रुग्णालयाला घरे मिळण्याचा मार्ग मोकळा

तिची स्थानिक डॉक्टरांनी तपासणी केली आणि 15 वर्षांपूर्वी मिट्रल हार्ट व्हॉल्व्ह लीक झाल्याचे निदान झाले आणि वैद्यकीय व्यवस्थापनाचा सल्ला दिला. तिची लक्षणे हळूहळू वाढू लागली. तिने पूर्ण तपासणी केली आणि इको-कार्डिओग्राफी केली जिथे गंभीर मिट्रल व्हॉल्व्ह रेग्युर्जिटेशन आणि हृदय वाढल्याचे आढळून आले. पुढील कोरोनरी अँजिओग्राफी आणि कार्डियाक सीटी स्कॅन अँजिओने अलकापा असल्याचे निदान झाले.

याशिवाय मधुमेह आणि तिला मूत्रपिंडाचा आजार होता किडनी 50 टक्के काम करत होती. मात्र, तरीही डाॅक्टरांनी तिला हृदय शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. 10 नोव्हेंबर रोजी लीलावती रुग्णालयात या महिलेवर वरिष्ठ हृदय शल्यचिकित्सक डॉ पवन कुमार यांनी यशस्वी 8 तास अथक प्रयत्नांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. वरिष्ठ हृदय शल्यचिकित्सक डॉ पवन कुमार यांच्या मते,' अलकापा हा  दुर्मिळ ह्रदय विकार आहे .  दीर्घकाळापर्यंत ऑक्सिजनयुक्त रक्तपुरवठा नसणे आणि उजवीकडून डावीकडे रक्त पुरवठा होणे हे दोन कारणे याच्या परिणामांना कारणीभूत ठरतात.

डॉ. पवन कुमार म्हणाले की, त्यांच्या 30 वर्षांच्या अनुभवामध्ये ही पहिलीच केस आहे ज्यात अलकापा रिपेयरमध्ये मिट्रल हार्ट व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट,  बायपास सर्जरी आणि ह्रदयाचे ठोके सुरळीत केले. या सगळ्यामुळे हृदयाची शस्त्रक्रिया गुंतागुंतीची आणि धोकादायक बनली होती. पण, आता तीन प्रकारच्या शस्त्रक्रियेनंतर ही महिला पूर्णपणे बरी आहे आणि तिला बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे.

loading image
go to top