
मुंबई : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यभरात पावसाने हजेरी लावली आहे. मागिल दोन दिवसांपासून मुंबईसह उपनगर जिल्ह्यात पावसाची रिमझिम सुरूच आहे. अशातच आता पुढील काही तासांत मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. यामुळे नागरिकांनी बाहेर पडण्यापूर्वी पावसाचे अपडेट्स पाहूनच निघा, असे आवाहन करण्यात आले आहे.