Amit Satam Video : मुंबईतील दुर्घटनांचे भाजप शहराध्यक्षांना गांभीर्यच नाही? अमित साटम यांचा हसतानाचा व्हिडिओ व्हायरल, विरोधक आक्रमक

Mumbai Rain : एका घटनेत शाळेच्या बसवर झाड कोसळून चिमुकल्याचा मृत्यू झाला.दुसऱ्या घटनेत साकिनाका येथे असलम शेख यांचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला. या घटनांवर बोलताना आमदार अमित साटम हसतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्यांच्यावर असंवेदनशीलतेचे आरोप झाले.
Amit Satam seen smiling during a discussion with opposition leader Jayant Patil

Amit Satam seen smiling during a discussion with opposition leader Jayant Patil

esakal

Updated on

मुंबईत मुसळधार पावसामुळे दोन दिवसांत दोन दुर्दैवी घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. पहिल्या घटनेत शाळेच्या बसमवर झाड कोसळल्याने एका चिमुकल्याचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या घटनेत असलम शेख या व्यक्तीचा मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी अंत झाला. या दोन्ही घटनांमुळे मुंबईकरांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अशा संवेदनशील क्षणी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात ते हसताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com