

Mumbai rain update
esakal
Mumbai Rain Update: मुंबई आणि उपनगरांमध्ये मंगळवारी पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले. विशेषतः नवी मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला असून सायन-पनवेल महामार्गावरील परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. जुईनगर रेल्वे स्थानकाजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.