

Palghar Flood Situation Worsens; Schools and Colleges Shut
esakal
मुंबई शहर तसेच उपनगरांसह बहुतांश भागांत पावसाचा जोर कायम आहे. पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या तीव्रतेमुळे दक्षिण मुंबई, अंधेरी, बोरिवली, विरार, ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, नवी मुंबई, पनवेल, भिवंडी आणि पालघर परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस सुरू होता. पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार, पुढील ४८ तास राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम राहणार असून, त्यानंतर हळूहळू कमी होईल.