
मुंबईत पहिल्या पावसात भुयारी मेट्रोत पाणी घुसल्याने मेट्रोसेवेला फटका बसला आहे. नुकत्याच सुरु करण्यात मुंबई मेट्रो ३ च्या कामाची पोलखोल झाली. या बहुचर्चित भूमिगत मेट्रो मार्गावरील आचार्य अत्रे स्टेशन तसेच मेट्रो वाहतूक बंद करण्यात आली आहे. भूमिगत स्टेशन प्लॅटफॉर्म वर पाणी साचले असून छतावरून पाणी गळत आहे, पायऱ्यांवरून पाणी वाहत आहे.