Mumbai Rain News : मुंबईत पहिल्याच पावसाने अनेक ठिकाणी पाणी तुंबले, लोकल सेवेवर परिणाम; पुढील काही तास धोक्याचे, हवामान विभागाचा इशारा

Mumbai Waterlogging : मुंबई व उपनगरांमध्ये मंगळवार रात्रीपासून मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले आहे. साकीनाका, अंधेरी, वांद्रे, बोरीवली, गांधी मार्केट आदी भागांत वाहतूक ठप्प झाली आहे.
Mumbai Rain

Mumbai Rain

esakal

Updated on

मुंबई आणि उपनगरांमध्ये मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने शहरात मोठी अडचण निर्माण केली आहे. साकीनाका, वांद्रे, शिव, अंधेरी पश्चिम, बोरीवली पूर्व, गांधी मार्केट आदी ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहने बंद पडली आहेत. अंधेरी पश्चिममध्ये आज पहाटे ५.४० वाजताच पाणी साचलेले दिसून आले. मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे बंद करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com