
मुंबई आणि उपनगरात पहाटेपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली आणि बोरीवली या पश्चिम उपनगरांतील भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रात पुढील चार दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली असून, अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, वाहतूक कोंडी आणि पाणी साचण्याच्या समस्येने नागरिक त्रस्त झाले आहेत.