esakal | मुंबईत अतिवृष्टीची शक्यता; प्रादेशिक हवामान विभागाचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

heavy rainfall

मुंबईत अतिवृष्टीची शक्यता; प्रादेशिक हवामान विभागाचा इशारा

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : मुंबईत (Mumbai) येत्या 24 तासात पावसाचा जोर (heavy rainfall) वाढण्याची शक्यता असून काही भागात अतिवृष्टीचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने (regional meteorological center) दिला आहे. मुंबईत गेले काही दिवस पाऊस पडत आहे. कधी सौम्य तर कधी मध्य सरी कोसळत आहेत. मंगळवारी मात्र पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून मुंबईसह ठाणे,पालघर आणि रायगड मध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. काही भागात मुसळधार तर काही भागात अतिवृष्टी होण्याचा अंदाज ही हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते (shubhangi bhute) यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा: मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या नव्या ३४७ रुग्णांची भर; ६ जणांचा मृत्यू

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानंतर गुजरात मध्ये देखील कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याची तीव्रता वाढली असून त्याचा प्रभाव कोकण,मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा आणि विदर्भात जाणवणार आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे ,पालघर,रायगड मध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर मात्र ही तीव्रता कमी होत जाणार आहे.

loading image
go to top