
काल, बुधवार संध्याकाळपासून मुंबई आणि उपनगरांना मुसळधार पावसाने झोडपून काढले. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पडलेल्या या पावसाने मुंबईकरांची तारांबळ उडवली. संध्याकाळी कार्यालयातून घरी परतणाऱ्या नोकरदार वर्गाला या अचानक पावसाने मोठा त्रास सहन करावा लागला. पश्चिम आणि पूर्व उपनगरांमध्ये पाणी तुंबल्याने रस्त्यांवर खोळंबा झाला, तर काही ठिकाणी मोठ्या दुर्घटना टळल्या, याचे कारण म्हणजे रात्र होती!