मुंबई : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची मागणी राज्य सरकारने मान्य केली. जरांगे यांनी आमरण उपोषण सोडले, आंदोलन संपले. पण पाच दिवसांच्या आंदोलनादरम्यान मुंबईत सार्वजनिक मालमत्तेच्या झालेल्या नुकसानाची भरपाई कोण देणार, अशी विचारणा बुधवारी (ता. ३) उच्च न्यायालयाने केली. सरकारच्या मध्यस्थीने आंदोलन संपल्याची माहिती महाधिवक्ता बीरेंद्र सराफ आणि जरांगेंच्या वतीने वकील सतीश मानेशिंदे आणि व्ही. एम. थोरात यांनी न्यायालयाला दिली.