'डॅडी'च्या जन्मठेप पुनर्विचार याचिकेवर मुंबई हायकोर्टाने दिला 'मोठा' निर्णय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 डिसेंबर 2019

मुंबई : मुंबईतील शिवसेना नगरसेवकाच्या हत्येप्रकरणी मुंबईतील कुख्यात गॅंगस्टर अरुण गवळी याच्या शिक्षेवर मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. यामध्ये अरुण गवळी याची कमलाकर जामसंडेकर हत्येप्रकरणी भोगत असलेली  जन्मठेपेची  शिक्षा कायम ठेवलीये.

मोक्का अंतर्गत न्यायालयानं अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. यावर अरुण गवळीच्या वकिलांकडून मुंबई उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाकडून अरुण गवळी याची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवण्याचा निर्णय दिलाय. 

महत्त्वाची बातमी :  भाजपमधील नाराज एकमेकांच्या भेटीला ?

'अरुण गवळी'बद्दल थोडक्यात :  

  • अरुण ग‍वळी उर्फ डॅडी शिवसेना नगरसेवकाच्या खून  प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे
  • अरुण गवळी हा मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यातून मुंबईत व्यवसायासाठी आलेले गुलाबराव गवळी यांचा मुलगा 
  • घरातील बेताच्या आर्थिक स्थितीमुळे अरूण गवळीला पाचवीत शाळा सोडावी लागली
  • 1980 ते 1990 च्या दशकात मुंबईतील भायखळा भागात अरुण गवळी घरोघरी दूध पोहोचवायचा 
  • अरुण गवळी हा  मुंबईतील राम नाईक गॅंगमध्ये सहभागी झाला
  •  यानंतर त्याने डरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमसाठी काम सुरु केलं 

महत्त्वाची बातमी :  खुशखबर, खुशखबर, खुशखबर.. IRCTC देणार 'ही' खुशखबर..

अरुण गवळीसोबत आणखीन दहा जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. अरुण गवळी सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगतोय. 

शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांचा 2007 साली खून करण्यात आला होता. नगरसेवकाच्या खुनासाठी अरुण गवळी याने तब्बल तीस लाखांची सुपारी दिली होती.

मोक्का न्यायालयाने अरुण गवळीला 14 लाखांचा दंड आणि जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. ही शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवलीये.   

Webtitle : mumbai high court on gangster arun gawalis life imprisonment

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai high court on gangster arun gawalis life imprisonment