esakal | निर्माता राकेश ओमप्रकाश मेहरा यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा IHigh Court
sakal

बोलून बातमी शोधा

राकेश ओमप्रकाश मेहरा

निर्माता राकेश ओमप्रकाश मेहरा यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : निर्माता राकेश ओमप्रकाश मेहरा यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा मिळाला. मेहरा यांनी पुर्नविकासासंबंधित केलेला दावा रद्द करण्याची मागणी करणारी बांधकाम व्यावसायिकाचा अर्ज न्यायालयाने नामंजूर केली.

पाली हिल येथील सोसायटीसह मेहरा यांनी त्यांच्या मालमत्तेबाबत पुर्नविकासासंबंधित दावा उच्च न्यायालयात केला आहे. मात्र हा दावा उच्च न्यायालयात न करता सहकार न्यायालयात किंवा लवादापुढे करायला हवा, असा दावा करणारा अर्ज विकासकाने न्यायालयात केली होती. न्या गौतम पटेल यांच्यापुढे यावर सुनावणी झाली. संबंधित दावा योग्य न्यायालयात दाखल करायला हवा, असा युक्तिवाद याचिकादारांकडून करण्यात आला. मात्र संबंधित करार हा सोसायटी आणि विकासकासाठी आहे, असा युक्तिवाद मेहरा व अन्य जणांकडून करण्यात आला. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य मानला आणि विकासकाचा अर्ज नामंजूर केला.

loading image
go to top