
Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी, न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. आंदोलनामुळे मुंबईतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी आणि वाहतूक कोंडी झाल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.