Mumbai Pollution: मुंबईत ध्वनी, वायुप्रदूषणाची गंभीर समस्या; उच्च न्यायालयाचे तपशील सादर करण्याचे आदेश

Mumbai High Court: मुंबईत ध्वनी, वायुप्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण होत असताना याबाबत उच्च न्यायालयाने महाधिवक्त्यांना तपशील सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
Mumbai High Court

Mumbai High court

Esakal

Updated on

मुंबई : शहरातील सण-उत्सवांदरम्यान लाऊडस्पीकर, अॅम्प्लिफायरच्या आवाजासह सार्वजनिक ठिकाणी फोडण्यात येणाऱ्या फटाक्यांमुळे ध्वनी व आणि यंदाचा सविस्तर वायुप्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्याची स्वतःहून दखल घेत उच्च न्यायालयाने सोमवारी (ता. २१) जनहित याचिका दाखल केली. ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सरकारने काय कारवाई केली? ध्वनिप्रदूषणाचे नियम पाळले जातात का? त्याबाबतचा गतवर्षीचा ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे तपशील सादर करण्याचे आदेश महाधिवक्त्यांना दिले आणि सुनावणी मंगळवारी (ता. २२) सूचीबद्ध केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com